Deputy Chief Minister Ajit Pawar esakal
सातारा

अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना मिळणार 7 लाख

प्रशांत घाडगे

सातारा : अतिवृष्टी (Patan Taluka Landslide) झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून सातारा जिल्ह्याला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबर या घटनेत मृत्यू (Ambeghar Landslide) झालेल्या प्रत्येक व्यक्तीमागे सात लाख रुपयांची मदत देणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी जाहीर केला आहे. सांगली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून पवार यांनी सातारा येथे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल आदी उपस्थित होते. (Patan Landslide Deputy Chief Minister Ajit Pawar Pledged To Give 100 Crore To Satara District bam92)

दरवर्षी जोरदार पावसाने दुर्गम भागात ओढे व नाल्यावरील ब्रिटिशकालीन मोरी वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत.

नैसर्गिक घटनांशी सामना करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बोटी व वस्तूंची खरेदी करा. दरवर्षी जोरदार पावसाने दुर्गम भागात ओढे व नाल्यावरील ब्रिटिशकालीन मोरी वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे, अनेक गावे संपर्कहीन होताना दिसून येत आहे. या दुर्घटना टाळण्यासाठी मोरी बांधण्याऐवजी स्लॅबचे पूल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधावेत. तसेच, गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे आठवडाभरात पूर्ण करण्याचे आदेश देत बाधित नागरिकांना चांगली घरे देणार असल्याचे आश्‍वासन पवार यांनी दिले आहे. तसेच, कोयना वसाहतीतील घर दुरुस्तीसाठी निधी देणार आहे. याचबरोबर भूस्खलन झालेल्या लोकांना महसूल आणि वनविभागाच्या जागा उपलब्ध करून द्या, असे सांगत पवार यांनी ज्या गावात गरज आहे तिथेच काम करा, असेही बजावले.

Ajit Pawar

अतिवृष्टीत नुकसान झाले आहे त्यांचे पुनर्वसन जलसंपदा अथवा वनविभागाच्या जागेत करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. दरम्यान, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या घरांना दगडाचा धोका आहे. त्यामुळे त्याचा सर्व्हे करून सातारा पालिकेला त्यात सहभागी करून घ्यावे, असे आदेश पवारांनी दिले. यावर अजिंक्यतारा किल्ला संरक्षण भिंतीचे काम करणे आवश्यक असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगताच यासाठी किती निधी आवश्यक आहे, याची माहिती उद्या संध्याकाळपर्यंत पाठवा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

NDRF उभारण्याची मागणी करणार

अजित पवार यांनी बैठकीत सांगितलेल्या प्रत्येक बाबींची पूर्तता १५ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देत या बाबतीत मी कोणाचे ऐकणार नसल्याचेही अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच, दुर्घटनाग्रस्त भागात तातडीने मदत मिळण्यासाठी एनडीआरएफच्या (NDRF Team) धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी कऱ्हाड येथे एसडीआरएफ केंद्र व्हावे, अशी मागणी करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Patan Landslide Deputy Chief Minister Ajit Pawar Pledged To Give 100 Crore To Satara District bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT