Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray esakal
सातारा

उद्धव ठाकरेंनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; बंडखोर आमदार देसाईंचं आवाहन

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलंय.

सकाळ डिजिटल टीम

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलंय.

सातारा : शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात वाद सुरु झाला आहे. हा वाद आत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दारात पोहचला असून 8 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगात याबाबत सुनावणी होणार आहे. असं असताना माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, असं त्यांनी म्हटलंय. अडीच वर्षात महाविकास आघाडीत आमची कोंडी झाली. उद्धव ठाकरेंबद्दल आदाराची भावना आहे, त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये. आम्ही शिवसेनेसाठी अनेक वर्षे काम केलं. एकनाथ शिंदेनी वेळोवेळी उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं वेळोवेळी सांगितलं. पण, याकडं दुर्लक्ष झालं.

सध्या शिवसेना पोखरण्याचं काम सुरूय. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलंय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) राष्ट्रीय आणि युगपुरुष आहेत. बाळासाहेबांना एका कुटुंबापूर्ती मर्यादीत करू नका, असा सल्ला देत ते म्हणाले, बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा आहे, असंही देसाईंनी ठामपणे सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT