Prithviraj Chavan esakal
सातारा

घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत; माजी मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास

जिंती, ढेबेवाडीत स्थलांतर केलेल्या दरडग्रस्तांशी संवाद

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : ‘खचलेले डोंगर व दरडींमुळे (Patan Taluka Landslide) अडचणीत आलेल्या गावांच्या मागणीनुसार कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे, त्यामुळे घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, आलेल्या संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ या,’ अशा शब्दात माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी जिंती व ढेबेवाडी येथे स्थलांतर केलेल्या विविध वाड्यावस्त्यांतील पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

जिंतीतील वाड्यावस्त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करू.

अतिवृष्टीमुळे ढेबेवाडी विभागात झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन श्री. चव्हाण यांनी धोकादायक दरडींमुळे गाव सोडून सुरक्षितस्थळी आश्रय घेतलेल्या धनावडेवाडी, शिंदेवाडी, जितकरवाडी, भातडेवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, मनोहर शिंदे, नीलम येडगे, धनश्री महाडिक, अभिजित पाटील, नरेश देसाई, सौ. मंदाकिनी पाटील, वंदनाताई आचरे, अमोल पाटील, सतीश कापसे, संगीता तिवारी, अशोकराव पाटील, दादासाहेब साळुंखे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘जिंती येथील वाड्यावस्त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करू, मात्र या ठिकाणच्या लोकांनी त्याबाबत ठाम निर्णय घेऊन आवश्यक कागदोपत्री पाठपुरावा करावा.’’ हिंदुराव पाटील म्हणाले, ‘‘धोकादायक दरडी, वन्यश्वापदांचा उपद्रव व मराठवाडीचा जलाशय यामुळे चोहोबाजूंनी अडचणीत आलेल्या या गावांच्या पुनर्वसनासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा.’’ शंकरराव पवार यांनी प्रास्ताविक केले. उमेश चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT