Minister Ramdas Athawale esakal
सातारा

मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, तर त्याचा भाजपलाच फायदा : आठवले

उमेश बांबरे

सातारा : खराब वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आले नाही. पण, मी गाडीतून आलेला असून माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. टेक्निकल अडचणीमुळे ते परत गेले असतील, पण त्यांनी साताऱ्यातील नुकसानग्रस्त (Patan Taluka Landslide) एका ठिकाणीतरी भेट द्यावी. त्यांचे मुंबईला परत गेलेलं हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे, असा सल्ला अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना दिला आहे. वाई तालुक्यातील नुकसानीचा दौरा केल्यानंतर मंत्री रामदास आठवले काल सातारा शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा कालचा दौरा अपूर्ण राहिला, मात्र तुम्ही तुमचा दौरा पूर्ण केला, याप्रश्नावर त्यांनी दिलखुलास उत्तर दिले. (Patan Taluka Landslide Ramdas Athawale Said That BJP Will Benefit From My Ministerial Post Political News bam92)

वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर आले नाही. पण, मी गाडीतून आलेलो असल्याने माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही.

मंत्री आठवले म्हणाले, वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर आले नाही. पण, मी गाडीतून आलेलो असल्याने माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. यामध्ये टेक्निकल अडचण असल्याने ते परत गेले असतील. पण, त्यांनी पुन्हा यावे, पाटण तालुक्यात मोठे नुकसान झालेले आहे. सातारा जिल्ह्यात त्यांनी एका ठिकाणीतरी त्यांनी भेट द्यावी. त्यांचे मुंबईला परत गेलेलं हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नद्या जोड प्रकल्प न केल्यामुळे ही पूरपरिस्थिती येत आहे का? याविषयी विचारले असता रामदास आठवले म्हणाले, मला खंडाळ्यातील काही लोकांनी धरणांचे पाणी मिळत नसल्याबाबतचे निवेदन दिले आहे. मुळात बारामतीला पाणी जाणे आवश्यक आहे, पण खंडाळ्यातही पाणी आले पाहिजे. यासंदर्भात मी जलसंपदा विभागाशी बोलणार असून लवकरच बैठकही घेणार आहे. बारामतीवर अन्याय करायचा नाही. कारण, बारामतीने अनेकांना न्याय दिला आहे. खंडाळ्यालाही बारामतीने न्याय द्यावा, अशी आमची इच्छा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली योजनांची अंमलबजावणी झाली असती, तर पूरपरिस्थिती उद्भवली नसती. यापुढेही याचा विचार राज्याने व केंद्राने करावा. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानमंत्री असताना नद्याजोड प्रकल्पासाठी एक लाख ३२ हजार कोटी रूपये मंजूर केले होते. नव्य मोदी सरकारनेही जलसंपदा विभागाबाबत चांगली भूमिका आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जास्त अंमलबजावणी होऊ शकले, यासाठी प्रयत्न करेन. बारामतीने अनेकांना न्याय दिला, त्या यादीत तुम्ही आहात का, यावर प्रश्नावर ते म्हणाले, बारामतीने मला न्याय दिलेला आहे. मीही बारामतीला न्याय दिलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या पाठींब्यामुळे १९९० मध्ये मी मंत्री झालो. त्यावेळी काँग्रेसला सत्ता मिळाली होती. १४१ जागा आल्या होत्या. रिपाइचा पाठिंबा मिळाला नसता भाजपचे सरकार सत्तेत आले असते. या बदल्यात मलाही मंत्रीपद मिळाले होते. केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद का मिळाले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, मला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असते तर आनंद झाला असता. मी सध्या राज्यमंत्री आहे. लोकांना अपेक्षा असेल, पण माझ्या पक्षाचे खासदार जास्त नाहीत. कॅबिनेटमंत्री पद मिळाले तर त्याचा फायदा भाजपला होणार आहे. नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भविष्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळेलही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Patan Taluka Landslide Ramdas Athawale Said That BJP Will Benefit From My Ministerial Post Political News bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT