satara sakal
सातारा

अतिवृष्टीग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष द्या; वेण्णा पूरग्रस्त समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

२२ गावांतील शेतकऱ्यांना द्या न्याय

सकाळ वृत्तसेवा

केळघर : जावळी तालुक्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वेण्णा नदीस महापूर आला होता. यामुळे केळघर विभागातील सावली ते बोंडारवाडी दरम्यान दोन मोठे पूल व तीन लहान पूल वाहून गेले होते. नदीकाठावरील २२ गावांतील शेती, विहिरी, विजेच्या मोटारी वाहून गेल्या होत्या. मात्र, सहा महिने उलटूनही प्रशासन पुरेसे लक्ष देत नाही. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याकडे गांभीर्याने पाहून २२ गावांतील शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज लेखी निवेदनाद्वारे वेण्णा पूरग्रस्त समितीने सातारा येथे केली.

याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना आज निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, वेण्णा पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे, वरोशीचे सरपंच विलास शिर्के, सुरेश कासुर्डे, बजरंग चौधरी, वैभव ओंबळे, अशोक मानकुमरे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातील माहिती अशी, की जुलै महिन्यात जावळीत झालेल्या अतिवृष्टीमुळे वेण्णा नदीस महापूर आलेला होता. यामुळे केळघर विभागातील २२ गावांतील शेतीचे, विहिरींचे, विजेच्या मोटारीचे नुकसान झाले होते. २२ गावांतील बोंडारवाडी ते सावली दरम्यान २ मोठे व ३ लहान पूल वाहून गेल्याने २२ गावांतील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑगस्ट महिन्यात २२ गावांतील शेतकरी, ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन वेण्णा पूरग्रस्त समिती स्थापन केली होती. नांदगणे ते पुनवडी पूल व केळघर ते डांगरेघर पूल व रस्ता, तसेच नांदगणे ते वाहिटे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अजून झाले नाही. केळघर- डांगरेघर रस्ता अजूनही मोठ्या वाहनांसाठी खुला नाही.

नांदगणे ते पुनवडी पुलाची दुरुस्ती ही तात्पुरता भराव टाकून केला आहे. मात्र, या पुलाची दुरुस्ती न झाल्याने वाहने या पुलावरून ये- जा करत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन पायपीट करून जावे लागत आहे. सावली ते बोंडारवाडी दरम्यान वेण्णा नदीच्या पात्राचे सरळीकरण व खोलीकरण करणे आवश्यक आहे. हे काम न केल्यास पुन्हा पाऊस सुरू झाल्यावर शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. नदीकाठी असणाऱ्या २०७ विहिरी गाडलेल्या असून, यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम पूरता वाया गेला आहे. या विहिरींचे पंचनामे झाले आहेत. मात्र, या विहिरी सात बारावरून कमी करण्यास तहसीलदारांनी असमर्थता दाखवल्याने नवीन विहिरी खोदण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. हे निवेदन खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT