सातारा

सातारकरांनाे, यामुळेच लॉकडाउनचा निर्णय झाला; वाचा सविस्तर

उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा हळूहळू सुरू व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला; पण सातारकरांनी दिलेल्या शिथिलतेचा गैरफायदा अधिक घेतल्याने पुन्हा दहा दिवसांचे लॉकडाउन सातारकरांनी ओढावून घेतले आहे. दुकाने, मेडिकल, भाजी मंडई, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दीचे प्रमाण वाढले. त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ झाल्याची चर्चा चौकाचौकांत रंगलेली होती. लॉकडाउनच्या आदेशातही प्रशासनाने रुग्णसंख्या वाढल्यानेच संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काेराेनाबाधित, साताऱ्यातील कामकाज दाेन दिवस बंद
 
कोरोनाचा संसर्ग सुरुवातीला दहा, पुन्हा शंभर आणि आता जुलैमध्ये 1954 पर्यंत पोचलेला आहे. कोरोना गांभीर्याने घेतला गेला नसल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात चोरीचुपके येणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले अन्‌ ज्या गावांनी कोरोना येऊ नये म्हणून कडक उपाययोजना केल्या तेथूनच बाधित रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. परिणामी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग हादरून गेला आहे. 

मे महिन्यापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या हजाराच्या आतच होती; परंतु जून, जुलैमध्ये यामध्ये प्रचंड वाढ झाली. जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही पुणे, मुंबई, तसेच इतर जिल्ह्यांतून विनापरवाना येणाऱ्यांचे प्रमाण वाढले, तसेच लग्न समारंभ, अंत्यविधी व चोरीचुपके जेवणावळी यातूनच कोरोनाचा प्रसार वाढला. प्रशासनाने या सर्वांवर निर्बंध घातलेला असला, तरी दुसऱ्या मार्गाने केले आणि व्हायचे तेच झाले. आज जिल्ह्याची कोरोनाबाधितांची आकडेवारी दोन हजारांकडे पोचली आहे.

विरोध पक्ष नेते म्हणाले... ह्यांना हुकी आली आणि सातारा झाला लॉकडाउन
 
जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही सातारकर जनतेला सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, विनाकारण बाहेर पडू नका, घरीच थांबा अशा सूचना करूनही त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. ज्या गावात कोरोनाचा रुग्ण नव्हता तेथील लोक मास्कच वापरत नव्हते. गावाच्या चौकात, मंदिराशेजारी गप्पा मारणाऱ्यांची मैफील पाहायला मिळत असे, तर शहरी भागात भाजी मंडईची सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून सोयच केली नाही. त्यामुळे ज्या भागात कोरोना बाधित सापडला त्या भागातून विक्रेते दुसऱ्या ठिकाणी जाऊन विक्री करू लागले. पर्यायाने लोकांना लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंसाठी गाडी घेऊनच बाहेर पडावे लागू लागले. यातूनच बाजारपेठेत गर्दी दिसू लागली. 

पोलिस यंत्रणेने सुरवातीला लॉकडाउनची कडक उपाययोजना केली; पण ज्यावेळी कर्तव्यावरील पोलिस कर्मचारीच कोरोना बाधित आढळू लागले. त्या वेळी त्यांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी वाहनांच्या गर्दीपासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सवलतीचा एक प्रकारचा फायदाच घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम संसर्ग वाढून रुग्णसंख्या प्रचंड वाढू लागली आहे. 

राजस्थानच्या राजकीय घडामोडीविषयी महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणाले...

जिल्ह्यात सुरुवातीला कऱ्हाड व पाटण तालुका व त्यातील काही गावे कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती; पण आता सातारा, वाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहेत, तर बाहेरच्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक दुष्काळी खटाव व माण तालुक्‍यांत आल्याने तेथेही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. याला व्यापारी व व्यावसायिकांचा विरोध आहे. विरोध असणे सहाजिक असले तरी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउन हाच एकमेव उपाय नाही, तर नागरिकांनी लॉकडाउनच्या काळात घरातच थांबणे, मास्क वापरणे, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे, विनाकारण बाहेर न येणे, प्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घेणे आदी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य यंत्रणेसोबतच प्रत्येक नागरिकाचे आपणच आपली काळजी घेणे हे आताच्या काळात कर्तव्य बनले आहे. त्याकडे थोडे दुर्लक्ष झाल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता किमान पहिल्या सहा दिवसांच्या कडक लॉकडाउनमध्ये तरी नागरिकांनी घरीच थांबून स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे, तरच कोरोनाला पायबंद बसणार आहे. 


कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन गरजेचे आहे; पण नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे हे लॉकडाउन ओढावून घेतल्यासारखाच आहे. लॉकडाउन व्हावे, हे कोणत्याच व्यावसायिकांना वाटत नाही; पण लोकांच्या बेशिस्तीचा हा परिणाम म्हणावा लागेल.'' 

राजू गोडसे, अध्यक्ष, सातारा शहर मर्चण्ट चेंबर ऑफ कॉमर्स 

तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन जो निर्णय घेईल त्याला नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे. जिल्हा प्रशासनाची भूमिका योग्यच आहे. कारण व्यापारी, व्यावसायिक हा प्रथम नागरिक आहे. कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थिती आटोक्‍यात येण्यासाठी प्रशासनाचा निर्णय योग्य आहे.

 गुरुप्रसाद सारडा, अध्यक्ष, सातारा मर्चण्ट ऑफ चेंबर्स 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT