सातारा

पेठ किन्हई ग्रामपंचायतीत 40 वर्षांनंतर सत्तांतर; अश्विनी मदने सरपंचपदाच्या मानकरी

साहेबराव हाेळ

गोडोली (जि. सातारा) : राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या पेठ किन्हई (ता. कोरेगाव) येथील ग्रामपंचायतीत 40 वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. ग्रामपंचायतीत नऊ सदस्यसंख्या आहे. पैकी आमदार महेश शिंदे पुरस्कृत व डॉ. गजानन चिवटे पॅनेलप्रमुख असलेल्या साखरगड निवासिनी परिवर्तन पॅनेलचे पाच उमेदवार निवडून आले. तर माजी सरपंच गुलाबभाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली श्री यमाईदेवी ग्रामविकास पॅनेलला चार सदस्यांवर समाधान मानावे लागले. श्री यमाईदेवी पॅनेल आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत केलेले होते. 

निवडणूक निर्णय अधिकारी आंधळकर यांनी सरपंच व उपसरपंचपदासाठी बोलावलेल्या बैठकीत साखरगड निवासिनी परिवर्तन पॅनेलच्या अश्विनी मदने यांचा सरपंचपदासाठी व शिवाजी ज्ञानदेव सपकाळ यांचा उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल झाला. विहित वेळेत प्रतिस्पर्धी उमेदवारी अर्ज न आल्यामुळे श्री. आंधळकर यांनी अश्विनी मदने व शिवाजी सपकाळ यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

आमदार महेश शिंदे, पॅनेलप्रमुख डॉ. गजानन चिवटे, रोहिदास चिकाटे, गणेश भोसले, श्रीरंग मदने, दिलीप मदने, माजी सरपंच शंकर चिकाटे, सचिन फणसे, सुभाष भोसले, संपत भिसे, नीलम जाधव, सुरेखा भिसे, प्रिया गवंडी, शोभा ढवळे यांनी सरपंच व उपसरंपचांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी सरपंचांनी अंतर्गत रस्ते, बाजार मैदानाचे सुशोभीकरण, पाणीपुरवठा योजना सुरळीत करणे, पाणंद रस्ते व साखरगडावर कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यावर भर दिला जाईल, असे सांगितले.

शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्‍मा शिंगाडे; भोसले उपसरपंच

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT