Petrol Pump Workers esakal
सातारा

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा; रस्त्यात सापडलेले पैसे केले परत

अनिल घाडगे

शिरवडे (सातारा) : सध्या जगात प्रामाणिकपणा शिल्लकच राहिला नाही, असं काहीसं मत प्रत्येकाच्याच तोंडी येतं, त्यामुळे काहींचा माणुसकीवरचा विश्वास उडून गेला आहे. मात्र, याला काहीजण अपवाद आहेत. ते त्यांच्या परीनं सामाजिक कार्य (Social work) करतच आहेत आणि माणुसकीही जपत आहेत. सातारा जिल्ह्यात वेळोवेळी माणुसकीचं दर्शन झालेलं पहायलं मिळत. कारण, रस्त्यात अथवा बसस्थानकात कोणतीही वस्तू किंवा दागिने सापडले, की ती ज्या कोणाची वस्तू असेल त्याला पोहोच करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माणुसकी खरंच शिल्लक आहे, याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. (Petrol Pump Workers Honestly Returned The Money Found On The Road To Farmer Umesh Jadhav)

सध्या जगात प्रामाणिकपणा शिल्लकच राहिला नाही, असं काहीसं मत प्रत्येकाच्याच तोंडी येतं, त्यामुळे काहींचा माणुसकीवरचा विश्वास उडून गेला आहे.

कऱ्हाड-मसूर रस्त्यालगत संजय पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सापडलेले पाकिट परत केले. चिखली येथील शेतकरी उमेश दिलीप जाधव हे पेट्रोल भरण्यासाठी मसूरजवळील संजय पंपावर आले होते. जाताना रस्त्याने पडलेले पाकिट राजू मनिराम बांगर व मनोज सोपान चव्हाण यांना रस्त्यावर सापडले.

त्यामध्ये रक्कम पाच हजार आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पाकिटातील कागदपत्रांवरून त्यांनी संपर्क साधला. पाकिटाची शहानिशा करून रोख रक्कम पाच हजार व कागदपत्रांसह पाकिट मूळ मालकाला परत केले. जाधव यांनी दोघांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. पंपाचे मालक बाजीराव चव्हाण यांनीही दोघांचे अभिनंदन केले.

Petrol Pump Workers Honestly Returned The Money Found On The Road To Farmer Umesh Jadhav

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT