Phaltan Sakal
सातारा

Phaltan Crime : पालकमंत्री, गृहमंत्र्यांवर आरोप करत ऑन कॅमेरा छाटलं बोट; फडणवीसांचे तात्काळ चौकशीचे आदेश पण...

घटनेनंतर सदर व्यक्तीने हॉस्पिटलमधून आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दत्ता लवांडे

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील धनंजय ननावरे यांनी ऑन कॅमेरा आपले बोट तोडल्याची थरकाप उडवल्याची घटना घडली. आपल्या भावाच्या आत्महत्ये प्रकरणी चौकशीत पोलिसांकडून दिरंगाई होत असून आरोपींना पोलिसांकडून संरक्षण देत असल्याचा आरोप करत त्यांनी हे कृत्य केले होते. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

अधिक माहितीनुसार, धनंजय ननावरे यांचे बंधू नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्ट रोजी आपल्या पत्नीसहित इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात काही लोकांचे नावे असलेली चिठ्ठी सापडली होती. पण या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत धनंजय ननावरे यांनी कॅमेरा सुरू करून आपल्या हाताचे बोट तोडले. या घटनेनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तर तोडलेले बोट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी प्रत्येक आठवड्याला गृहमंत्र्यांना माझ्या शरिराचा एक भाग तोडून भेट म्हणून देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ शूट करत त्यांनी बोट तोडलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हाताचे बोट तोडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी केलेला हा प्रयत्न आहे. ज्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांची सुद्धा नावे आहेत. माझ्या भावाने आत्महत्या करण्याच्या आधी त्यांची नावे स्पष्टपणे घेतली आहेत. तरीही पोलिस यंत्रणा काहीच करत नाही. आज त्यांच्या आत्महत्येला १८ दिवस झाले तरी राजकीय दबावातून तपास होत नाही."

"मी चौकशी केली तर ते म्हणाले की चौकशीसाठी पुरावे नाहीयेत. पण पुरावे नाहीत असं कसं काय? त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तर नावे लिहिली आहेत. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी भाजप सरकारला माझ्या शरिराचा एक एक भाग पाठवणार आहे." असं धनंजय ननावरे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर म्हणाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडिओमध्ये धनंजय ननावरे जी नावे घेत आहेत, ती नावे आणि त्यांच्या भावाने उल्हासनगरमध्ये पत्नीसह आत्महत्या केल्यावेळी चिठ्ठीत लिहून ठेवलेली नावे यात तफावत असल्याने पोलिस त्याचा तपास करीत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT