water scarcity Phaltan  Sakal
सातारा

फलटण शहर : फलटणच्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

पाणीटंचाईबाबत पालिकेकडून दुर्लक्षाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर : नगरपालिकेच्या इमारतीपासून केवळ शंभर फुटांवर असणाऱ्या काही घरांना गेली चार वर्षे कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारींना पालिकेकडून वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.शहरातील मेटकरी गल्लीतील नगरपालिकेच्या नवीन इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काही घरांना नगरपालिकेच्या गैरकारभारामुळे गेल्या चार वर्षांपासून कृत्रिम पाणीटंचाईस सामारे जावे लागत आहे. याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी तोंडी, लेखी तक्रारी, अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करूनही हा प्रश्न सोडविण्यास नगरपालिकाला अपयश आले आहे. नगरपालिकेकडून या प्रश्नाबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

कृत्रिम पाणीटंचाईमुळे खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर पाणी न मिळणे व चार वर्षांत हा प्रश्न न सुटणे या गंभीर बाबी असून, यामध्ये कोणी लक्ष घालणार आहे की नाही, असा सवालही येथून व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात पाणी मिळणार नसेल, तर स्थलांतर करावे लागण्याची भीतीही या परिसरातून व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने हा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा आगामी दोन एप्रिलपासून नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

माहिती न दिल्याने शास्ती...

पाणी येत नसल्याच्या कारणावरून येथील आय्याज कोतवाल यांनी नळ कनेक्शनबाबत माहितीच्या अधिकारात नगरपालिकेत माहिती मागविली होती; पण त्यांना माहिती मिळाली नाही. त्यानंतर अपिलात गेल्यावर माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले. सुनावणीवेळी नगरपालिकेतील तत्कालीन सहायक जन माहिती अधिकारी यांनी मुदतीत उत्तर न दिल्याचे मान्य केल्याने २०१७ रोजी त्यांना दोन हजार रुपयांची शास्ती लावण्यात आली होती. त्यानंतरही हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेकडून कुठलीही हालचाल झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT