सातारा

व्यापा-यांनाे! पुढील आदेश होईपर्यत रविवारचा आठवडा बाजार राहणार बंद

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि लाेणंद येथे काेराेनाच्या रुग्ण संख्येत झालेली वाढ राेखण्यासाठी दाेन्ही ठिकाणी 31 मार्चपर्यंत दाेन टप्प्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खंडाळा तालुक्याच्या नजीक असलेल्या फलटण तालुक्यात ही काेराेनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णांची संख्या राेखण्यासाठी फलटण पालिकेने 21
मार्चपासूनचा आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची व्यापा-यांसह ग्रामस्थांनी अंमलबजावणी करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.

फलटण शहरांतील तसेच तालुक्यामध्ये कोविड 19 रुग्णांच्या प्रमाणात वाढू  हाेऊ लागली आहे. यामुळे रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावे. ही चाचणी बंधनकारक असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे.

ग्रामस्थांनाे! 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू; सायंकाळी पाचनंतर घराबाहेर पडू नका

कोरोना चाचणी घेतल्याशिवाय दुकाने उघडल्यास त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. तरी फलटण शहरातील सर्व व्यावसायिक, फळभाजी विक्रेते तसेच रिक्षाचालक व व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी शंकर मार्केट येथील शाळा नंबर एक येथे असणाऱ्या पालिकेच्या दवाखान्यात व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये माेफत करून घेण्याबाबत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

फलटण शहराच्या आसपास व शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दक्षता म्हणून रविवार, दि. २१ पासून होणारा प्रत्येक आठवड्यातील रविवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद राहील. शेतकरी व फळभाजी विक्रेते यांनी यांची नोंद घ्यावी.

- मुख्याधिकारी प्रसाद काटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT