सातारा

लालपरीवर अवतरली गड-किल्ल्यांची रेखाचित्रे

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोना काळात लॉकडाउनमुळे पाच महिने एस.टी सेवा बंद ठेवल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता एस.टी वाहतूक सुरु होऊनही कोरोनाच्या धास्तीमुळे प्रवाशांनी एस.टी'कडे पाठ फिरविली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शहरातील "इनक्रेडिबल ग्रुप'ने सातारा-स्वारगेट विनावाहक बसला राणी लक्ष्मीबाईंचे नाव देऊन संपूर्ण बसच्या बाहेर गड-किल्ल्यांची चित्रे रेखाटली आहेत. 

कोरोना काळात मार्च महिन्याच्या अखेरपासून एस.टी सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्यात नियमांचे बंधन घालून काही प्रमाणात एस.टी सेवा सुरु करण्यात आली. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रवासी संख्या अल्प असल्याचे दिसून आले. त्यामुळे एस.टी'च्या फेऱ्यांचे संचलनही कमी ठेवण्यात आले होते. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असून संसर्ग नियंत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत एस.टी'ने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मात्र, एस.टी'ला लॉकडाउन पूर्वीचा प्रतिसाद अद्यापही मिळत नाही. त्यामुळे शहरातील इनक्रेडिबल ग्रुपने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे. 

अजिंक्‍यतारा, शनिवारवाडा अन् सुरक्षित प्रवासाचा संदेश
 
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसच्या बाहेरील बाजूस अजिंक्‍यतारा किल्ला आणि पुण्यातील शनिवारवाड्याच्या चित्रासह इतर गड-किल्ल्यांची नावे देऊन प्रवाशी संवाद साधतानाचे चित्र रेखाटून एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचा संदेश दिला आहे, तसेच सातारा-पुणे मार्गावरील काही ठिकाणांची नावे देऊन इनक्रेडिबल ग्रुपने अनोखा फंडा वापरला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT