PM Kisan Yojana latest marathi news esakal
सातारा

Satara : आता सरपंचांवरही ‘केवायसी’ची जबाबदारी

‘पीएम किसान’मध्ये अनिवार्य केल्याने निर्णय; तहसीलदारांच्या सूचना

- पांडुरंग बर्गे

कोरेगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सहभागी झालेल्या कोरेगाव तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही, त्यांची ती त्वरित करून घेण्याबाबत जागृती करण्याची जबाबदारी येथील तहसीलदार अमोल कदम यांनी तालुक्यातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवकांसह इतरांवर सोपवली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील लाभार्थींची ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र, सध्‍या या योजनेमधील सुमारे २५ ते ३० टक्के लाभार्थींची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार श्री. कदम यांनी ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सर्व गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सहकारी सेवा सोसायट्यांचे सचिव, सर्व पोलिस पाटील,

सर्व महा ई-सेवा केंद्रचालक व सर्व नागरी सेवा (सीएससी) केंद्रचालकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान

सन्मान निधी योजनेमधील लाभार्थींची ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील किसान सन्मान योजनेतील ज्या लाभार्थीनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना नागरी सेवा केंद्रावर अर्थात सीएससी केंद्रावर अथवा पी. एम. किसान पोर्टलवर जावून ती करून घेण्याबाबत जागृती करावी व त्याबाबतचा अहवाल आपल्या कार्यालयाकडे त्वरित पाठवावा. तहसीलदार श्री. कदम यांनी या पत्रासोबत संबंधितांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ई- केवायसी पूर्ण करावयाची राहिलेल्या लाभार्थींची यादीही पाठवलेली आहे. पत्रात लाभार्थीना आपापल्या मोबाईलवरून ई-केवायसी कशी पूर्ण करावी, याबाबतची माहितीही सविस्तर दिलेली आहे.

कोरेगाव तालुक्यातील स्थिती...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना एकूण लाभार्थी खातेदार : ४२,९२९

ई-केवायसी पूर्ण झालेले एकूण लाभार्थी : ३०,१९९ (७० टक्के पूर्ण)

ई-केवायसी न झालेले एकूण लाभार्थी : १२,७३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT