सातारा

पोलिसांच्या सतर्कतेने जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न फसला

उमेश बांबरे

सातारा : शिरवळ येथील बिल्डर गायकवाड याने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून संतोष मोहिते (रा. शिरवळ) यांच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकाम केले आहे. त्यावर कारवाई होत नसल्याने संतोष मोहिते यांनी मंंगळवारी (ता.3) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
संतोष ज्ञानोबा मोहिते (रा. गणेशकुंज सोसायटी, शिरवळ) यांच्या मालकीच्या जागेत बिल्डर आनंद गायकवाड याने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर बांधकाम केले आहे. याबाबत न्यायालयानेही बांधकाम स्थगितीचे आदेश दिले असतानाही बांधकाम सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करावी, अशी मागणी श्री. मोहिते यांनी केली होती. मात्र, वेळेत कारवाई न झाल्याने मंगळवारी (ता.3) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये अंगावर रॉकेल ओतून घेत श्री. मोहिते यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पाेलिस बनले भिकारी, रुग्ण अन् कुरिअर बाॅय; फरारी आराेपी पकडले


या वेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT