सातारा

खंडणीच्या गुन्ह्यात पाटण तालुक्यातील वनकर्मचाऱ्यास अटक

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : पिरेवाडी (ता. सातारा) येथील युवकाला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 25 हजार रुपये उकळल्याप्रकरणी एका वन कर्मचाऱ्यास बोरगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात चार वन कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश साहेबराव सोनावले (वय 28, रा. घोट, ता. पाटण) असे या वन कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला नुकतेच ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील वनपालासह अन्य दोन वनसंरक्षक अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत.
 
पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वन विभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 25 हजार रुपये उकळले होते. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. याची तक्रार ओंकार शिंदे याने पाच सप्टेंबर रोजी बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

बिहार जिंकण्यासाठीच भाजपचं लसीकरण; चव्हाणांची जाहीरनाम्यावर सडकून टीका

पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित, वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले, रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते. या दरम्यान त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळणार हे लक्षात येताच संशयितांनी अर्ज मागे काढून घेतला होता. अखेर वनसंरक्षक महेश सोनावले याला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

म्हसवडमध्ये शेळ्यामेंढ्यांच्या बाजारात तुफान गर्दी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT