सातारा

बनावट एफडीतून 71 लाखांची फसवणूक; ग्राहक सेवा केंद्र चालकास अटक

किरण बाेळे

फलटण शहर ः स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेच्या पाठीमागील बाजूच्या ग्राहक सेवा केंद्रातील चालकाने एफडीच्या बनावट पावत्या देऊन सुमारे 71 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने फलटण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सेवा केंद्र चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून 20 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. 27) दुपारी सव्वातीन ते सव्वाचारच्या दरम्यान अजय शरद कुलकर्णी (रा. लक्ष्मीनगर, फलटण) याने स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये सुरेश किसन झांझुर्णे (वय 58, रा. नांदल, ता. फलटण) यांची बनावट एफडी पावती करून 20 लाख रुपये स्वतःचे खात्यामध्ये जमा करत झांझुर्णे व त्यांच्या पत्नी राजश्री यांची 20 लाख रुपयांची फसवणूक केली. चित्रसेन यशवंत घाटगे (14 लाख), बबन विष्णू शिंदे (20 लाख) व आप्पासो परबती बोबडे (17 लाख) यांची एसटी महामंडळातून निवृत्त झाल्यानंतरची रक्कम सेवा केंद्रात एफडी करण्यासाठी दिली असता कुलकर्णीने खोटी पावती देऊन ही रक्कम स्वतःच्या खात्यावर जमा केली.

काळजी करुन नका! तुमच्यावर कारवाई हाेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा 
 
याबाबत सुरेश झांजुर्णे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात अजय कुलकर्णी याच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी फसवणुकीतील 20 लाख रुपये हस्तगत केले असून, कुलकर्णीला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे हे तपास करत आहेत.
 
फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, की ज्या लोकांनी स्टेट बॅंकेच्या पाठीमागे असलेल्या अजय कुलकर्णी यांच्या ग्राहक सेवा केंद्र यांच्याकडे एफडी काढली आहे. त्यांनी त्याबाबत संबंधित बॅंकेत खात्यावर एफडी जमा आहे का, याबाबत खात्री करावी. एफडी जमा नसल्यास फलटण शहर पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन प्रताप पोमण यांनी केले आहे.

जिवलग मैत्रिणींची चटका लावणारी एक्‍झिट

Edited By : Siddharth Latkar सातारा सातार सातारा सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT