सातारा

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी डांभेवाडीत पतीसह दोघांना अटक

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : डांभेवाडी (ता. खटाव) येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृत विवाहितेचा पती, सासू, सासरे अशा तिघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सारिका विशाल बागल (वय 29) असे विवाहितेचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांभेवाडी येथील विवाहिता सारिका बागल हिने शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृत महिलेच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. मृत विवाहितेचे वडील लाला गोविंद शिंदे (रा. भालवडी, ता. माण) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, सारिका हिचे पती विशाल बागल, सासू छबुताई बागल, सासरे लालासाहेब बागल (सर्वजण रा. डांभेवाडी) यांनी आपापसांत संगनमत करून सारिका हिला घरातील कामे नीट येत नाहीत, तुला मुले सांभाळणे होत नाहीत, असे म्हणून टोचून बोलून शिवीगाळ करत होते. तिला कष्टाची कामे करण्यास सांगून उपाशीपोटी ठेऊन शिवीगाळ, मारहाण करून, माहेरवरून शेतीसाठी पैसे घेऊन ये, असे म्हणून जाचहाट छळ केला आहे. 

पंकजाताईही महाबळेश्वरच्या प्रेमात, ट्विटद्वारे दिली माहिती आणि फोटोही केले शेअर

पती, सासू, सासरे यांच्या त्रासाला कंटाळून सारिका हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पती विशाल, सासू छबुताई यांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालकर करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT