सातारा

शेळकेवस्तीच्या तिघांना धडक देऊन पळून गेलेल्या युवकास पाेलिसांनी बारामतीत पकडले

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : लोणंद येथील शेळकेवस्ती अपघातातील संशयित मोसिम बालम बागवान (वय 30 रा. माळेवाडी, ता. जि. नगर) यास नुकतेच पोलिसांनी बारामती येथून अटक केली होती. त्याला खंडाळा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे. 

लोणंद- खंडाळा रस्त्यावर शेळके वस्तीजवळ घाडगे मळ्यानजीक गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाहनाने चिरडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनासह चालक बेपत्ता झाला हाेता. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनाची नंबर प्लेट पाेलिसांना मिळाली हाेती, त्यावरून संबंधित वाहनाचा शोध घेतला गेला. 

बबन नाना धायगुडे (वय 70), शांताबाई बबन धायगुडे (वय 64) व सारिका भगवान धायगुडे (वय 34) (सर्व रा. शेळकेवस्ती) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळ्यानजीक बबन धायगुडे, शांताबाई धायगुडे व सारिका धायगुडे हे तिघे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. घरापासून काही मीटर अंतर खंडाळा बाजूकडे चालत गेल्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास अचानकपणे पांढऱ्या रंगाच्या वाहनाने समोरून येत या तिघांनाही जोरदार धडक दिली. या अपघातात बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे हे जागीच ठार झाले, तर त्यांची सून सारिका या गंभीर जखमी झाल्या. पुणे येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. 

अपघातानंतर वाहन चालक पसार झाला हाेता. लोणंदच्या दिशेने सुसाट वेगाने वाहन निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले हाेते. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांचे सहकारी यांनी संबंधित वाहन चालकास बारामती येथून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे.

गट-तट, पक्षीय भूमिका बाजूला ठेवत ग्रेड सेपरेटरचा ताबा घ्या; रामराजेंचे सातारा पालिकेस आवाहन

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT