सातारा

पोलिसांनी रचला सापळा अन् चोरटा सात महिन्यांनंतर अलगद जाळ्यात फसला

सुनील शेडगे

नागठाणे : मत्त्यापूर (ता. सातारा) येथून दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मत्त्यापूर येथील वंदना शंकर घोरपडे यांच्या राहत्या घरातून अनोळखी चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले होते. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर व त्यांच्या पथकाने या चोरीचा कसून तपास केला. संबंधित चोरटे हे बोरगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिस पथकाने सापळा लावून संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मयूर विलास ननावरे (वय 24, रा. विसावानाका, मूळ करंजे, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. अन्य दोघे चोरटे अल्पवयीन आहेत. पोलिसांच्या तपास पथकात मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, किरण निकम, विजय सांळुखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, साडे नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

चार वर्षांनंतर भारतात होणार IPL लिलाव? तारीख ठरली, पण त्याच दिवशी IND vs SL सामना... सावळागोंधळ

Hormuz Closed: होर्मुझची सामुद्रधुनी बंद; मोठी दुर्घटना; भारताला फटका बसणार का?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT