सातारा

हॉटेल ग्रीनफिल्डमध्ये राडा; दहा जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : सदरबझार परिसरातील हॉटेल ग्रीनफिल्डमध्ये घुसून टोळक्‍याने व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. व्यवस्थापकाची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वेचले (ता. सातारा) येथील एक युवक गेल्या काही दिवसांपासून हॉटेलमध्ये येऊन तेथेच बसून जेवण्याचा आग्रह करत होता. बऱ्याच वेळा तो पार्सलचे बिल न देताच निघून जात होता. बिल मागितल्याच्या रागातून दहा ते बारा जणांना घेऊन तो हॉटेलमध्ये आला. त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरला बेदम मारहाण केली. या वेळी रॉडचा फटका लागून मॅनेजर गंभीर जखमी झाला. त्यानंतर टोळके तेथून पसार झाले.

पुरस्कारासाठी राजकीय पाठबळ हवे की, आणखी काय? मराठमोळ्या प्रियांकाचे मंत्र्यांना ट्‌विट  

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. हल्लेखोर व मारहाण झालेल्याची आधीपासूनच ओळख होती व किरकोळ कारणावरूनच ही मारहाण झाल्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले.

पृथ्वीराजबाबांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही

जागतिक वारसास्थळी फुलांचा नजराणा यंदा होणार कैद?

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RPI Leader Killed : पुणे हादरलं! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; पिंपरी-चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण, मोशीतील 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात सुखसागरनगरमधील जुन्या गोदामाला लागली आग!

Chhatrapati Sambhajinagar: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश; हाती आले २ हजार, खर्च मात्र २९००; संतप्त होऊन भरउन्हात रस्त्यावर फेकले कांदे

Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! मात्र या IT शेअर्सला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT