Pistol esakal
सातारा

कऱ्हाडात 50 अवैध पिस्तूल जप्त; छोट्या वादातही हवेत 'गोळीबार'

कऱ्हाडात पोलिसांकडून अनास्था; जिल्ह्यात सर्वाधिक अवैध पिस्तूल शहरात जप्त

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : शहरात लाठ्याकाठ्या सोडून पिस्तूल (Pistol) हातात खेळू लागल्या आहेत. गुंडांकडेही सर्रास पिस्तूल आहेत. त्या जप्त होण्याचे जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण कऱ्हाडमध्ये आहे. १० वर्षांत तब्बल ५० हून अधिक अवैध पिस्तूल जप्त झाल्या आहेत. त्यातील एकाही पिस्तुलाचा तपास शेवटपर्यंत गेला नाही. जप्त पिस्तुलांच्या तपासात पोलिसांची (Karad Police) अनास्था दिसते. मात्र, तीच अनास्था गुंडांच्या टोळ्यांसाठी बळ देणारी ठरते आहे.

शहरातील विशिष्ट गल्ल्यांमध्ये शेकड्याने अवैध पिस्तूल आहेत. छोट्या वादातही त्या हवेत झळकतात.

शहरातील विशिष्ट गल्ल्यांमध्ये शेकड्याने अवैध पिस्तूल आहेत. छोट्या वादातही त्या हवेत झळकतात. त्याहीपेक्षा भयानक स्थिती गुंडांच्या टोळ्यांकडून २००९ पासून जप्त झालेल्या पिस्तुलांच्या तपासाची आहे. दहा वर्षांत जवळपास ५० अवैध पिस्तूल पोलिसांनी जप्त केल्या. गुंडांच्या टोळ्यांशिवाय तस्करीला आलेल्या पिस्तुलांचाही भांडाफोड बऱ्याच वेळा येथे झाला. जप्त झालेल्या एकाही पिस्तुलाचा तपास शेवटपर्यंत गेलेला नाही. महाराष्ट्र केसरी संजय पाटील, मयूर गोरे, बबलू माने ते पवन सोळवंडे खून प्रकरणापर्यंतचा अवैध पिस्तुलांचा आलेख वाढताच असतानाही त्याच्या तपासाचे गांभीर्य पोलिसांना दिसत नाही. अवैध पिस्तूल लोकांना दिसते. मात्र, पोलिस त्याबाबत धृतराष्ट्राच्या भूमिकेत दिसतात. त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार चर्चेत आहेत.

शहरात अनेकदा पिस्तूल सापडली, की तडजोडीतून त्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळेच भरचौकात, घरात घुसून गोळ्या घालण्याची मजल गेली आहे. अवैध पिस्तुलाच्या शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन, गुन्हेगारांची झडती, पोलिसांची गस्त वाढवणे, गल्लीनिहाय डाटा ठेवणे, उपनगरांची माहिती ठेवणे अशा अनेक बाबी पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे गुन्ह्याची संख्या वाढत आहे. शहरात काही स्थानिक नेते, कार्यकर्त्यांकडेही अवैध पिस्तूल आहेत, अशी चर्चा आहे. त्याची चौकशी कोणाही करताना दिसत नाही. पिस्तुलांची चर्चा होते. मात्र, कारवाई होत नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. पिस्तूल सापडली, की कारवाई न होता होणारी तडजोड टाळण्याची गरज आहे.

अशी आहे स्थिती...

  • काळ्या बाजाराने मिळणारी रिव्हॉल्व्हर २५ हजार ते दीड लाखापर्यंत

  • तस्करीने मिळणारी १० मॅगॅझिनची पिस्तूल एक ते १० लाखांपर्यंत

  • दहा वर्षांत गुंडांकडून जप्त झालेल्या पिस्तुलांची संख्या २५

  • दहा वर्षांत तस्करीने जप्त झालेल्या पिस्तुलांची संख्या २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा दिवाळी सेलिब्रेशनसाठी केलं 'मॅचिंग मॅचिंग'; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण

Diwali Celebration : वसई विरार मध्ये शिवरायांच्या किल्ल्याचे दर्शन; ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत इतिहास कालीन किल्ले

Balipratipada and Padwa 2025: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Fursungi Nagar Parishad Election : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT