NCP esakal
सातारा

NCP महिला जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस; कोणाला मिळणार संधी!

उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक महिलांकडून अर्ज मागविले होते. त्यास महिला पदाधिकारी व कार्यकर्तींकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, तब्बल पाच महिलांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील दोन, सातारा तालुक्यातून एक, जावळी तालुक्‍यातून एक तर कऱ्हाड तालुक्यातून एका अर्जाचा समावेश आहे. यातील नेमक्‍या कोणत्या तालुक्यातील इच्छुक महिलेला अध्यक्ष होण्याचा मान मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक महिलांकडून अर्ज मागविले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत यापूर्वी एक जिल्हाध्यक्षा व दोन कार्याध्यक्षा अशी रचना तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी केलेली होती. त्यानुसार जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समिंद्रा जाधव, तर जयश्री पाटील आणि प्रा. कविता म्हेत्रे यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. या तिघींना पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करता यावे, यासाठी त्यांच्याकडे तालुकानिहाय जबाबदारी दिलेली होती. पण, कामकाज करताना तालुक्यांची मर्यादा येऊ लागल्यामुळे पदाधिकाऱ्यांतच वाद निर्माण होऊ लागले होते. तसेच संघटनेचे कोणतेच काम झाले नाही. याबाबतच्या तक्रारी विद्यमान प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोचल्या होत्या. याचदरम्यान प्रदेशाध्यक्षा चाकणकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महिला आघाडीतील धुसफूस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील यांनी त्यांच्यापुढे मांडली. त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांतील हा श्रेयवाद लक्षात घेऊन त्यांनी एकच जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला. तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांना प्रदेशवर (राज्यपातळीवर) काम करण्याची संधी दिली.

यामध्ये समिंद्रा जाधव यांना प्रदेश सरचिटणीस, प्रा. कविता म्हेत्रे व जयश्री पाटील यांना प्रदेश सचिवपदी संधी दिली. त्यामुळे या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या जागेसाठी प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी महिला जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी पक्षातील इच्छुक महिलांकडून अर्ज मागविले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल पाच महिलांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. या पाचमधील समिंद्रा जाधव यांच्याबाबत महिला आघाडीने पत्र पाठवून मुदतवाढ देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. या पत्रात यापूर्वी एक जिल्हाध्यक्षा व दोन कार्याध्यक्षा असल्याने सौ. जाधव यांना चांगल्या प्रकारे काम करता आलेले नाही. त्यामुळे त्यांनाच पुन्हा एक वर्ष मुदतवाढ मिळावी, असे या पत्रात म्हटले आहे. यावेळेस एकच जिल्हाध्यक्षा महिला आघाडीसाठी नेमण्यात येणार आहे. परिणामी तीन तालुक्यांपैकी कोणत्या तालुक्यातील महिलेला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार, याची उत्सुकता आहे.

जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक...

संजना जगदाळे (कोरेगाव), मीना बोरगावे (कऱ्हाड), सीमा जाधव (सातारा), वैशाली सुतार (कोरेगाव) तसेच समिंद्रा जाधव (जावळी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT