Satara Co-operative Bank esakal
सातारा

ठरलं! जिल्हा बॅंकेची रणधुमाळी ऑक्टोबरमध्ये

मतदार यादींचा कार्यक्रम सुरू, कोरोनामुळे निवडणुका पडल्या होत्या लांबणीवर

उमेश बांबरे

सातारा : राज्यातील 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (Satara Co-operative Bank) निवडणुकांसाठी काल सहकार निवडणूक प्राधिकरणाची बैठक झाली. यामध्ये निवडणुकीस पात्र जिल्हा बँकांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू करण्याची सूचना सहकार विभागाला देण्यात आली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम (Election Program) जाहीर केला जाणार आहे.

गेल्या दीड वर्षात जिल्हा बँकांच्या संचालकांना १५ महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.

कोरोनामुळे जिल्हा बँकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या दीड वर्षात जिल्हा बँकांच्या संचालकांना १५ महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती; पण आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल सहकार निवडणूक प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत ज्या टप्प्यांवर निवडणूक थांबली होती. तेथून पुढे कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला. राज्यातील १२ जिल्हा बँका या निवडणुकीसाठी पात्र असून, त्यांची प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया आता सप्टेंबरमध्ये होणार आहे. यामध्ये ठरावांची प्रक्रिया पूर्ण झालेल्यांची यादी तपासणीसाठी जिल्हा बँकांकडे पाठविली जाणार आहे. यामध्ये कच्ची यादी तयार करून ती प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती व सुनावणीसाठी दहा दिवसांचा कालावधी असेल. त्यानंतर ही यादी सह निबंधकांकडे पाठविली जाईल. तेथून यादी तपासल्यानंतर प्रारूप यादी तयार करून ती प्रसिद्ध केली जाईल.

या यादीवर हरकती, सुनावणी होईल. त्यासाठी दहा दिवसांचा कालावधी असेल. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्धीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम लावण्याची सूचना सहकार निवडणूक प्राधीकरण जिल्हा उपनिबंधकांना करेल. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम लागणार आहे. सप्टेंबरमध्ये प्रारूपाचा कार्यक्रम होणार आहे. एका वेळेस सर्व जिल्हा बँकांचे कार्यक्रम घेण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकांच्या यादीची कार्यक्रम सुरू करण्याची सूचना प्राधिकरणाने सहकार विभागाला केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Sonography: कारमध्येच करायचे सोनोग्राफी! नाशिकमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडीकस, कंपनीवरही गुन्हा

Latest Marathi News Live Update : माझ्या मुलीनं आत्महत्या केली नाही, तिला मारण्यात आलं; गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी कुटुंबीयांचा आरोप

तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, लंडनच्या गुलाबी थंडीतील व्हिडिओ, ट्रेलर चर्चेत

Horoscope Prediction : 7 डिसेंबरपासून मंगळ बदलणार त्याची चाल; 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु, प्रोमोशन नक्की !

Weight Loss Plan : पोटभर भात-भाकरी-ब्रेड खावूनही 7 दिवसांत कमी केले 1.7Kg वजन; तुम्हीही फॉलो करू शकता ही स्मार्ट पद्धत

SCROLL FOR NEXT