सातारा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ; भाजप आनंदीत

सचिन शिंदे

कऱ्हाड : पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यकाल संपल्यानंतरही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना वर्षभरासाठी मिळालेल्या मुदतवाढीवरून पालिकेचे राजकारण रंगले आहे. सत्ताधारी जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव व त्यांचा गट डांगे यांची मुदतवाढ कायम राहावी, यासाठी प्रयत्न करत आहे. तर बदली रद्द होणार असल्याच्या चर्चेनेच भाजप नगरसवेकांत आनंद आहे. जनशक्तीपासून दुरावलेल्या नेत्यांसह व त्यांचे समर्थक नगरसेवकही भाजपच्या आनंदात सहभागी आहेत. तर विरोधी लोकशाही आघाडीने अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय 
वातावरण ढवळून निघाल्याचे दिसते आहे.
सावधान! साताऱ्यात समूह संसर्ग सुरू 

श्री. डांगे यांचा येथील तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची रितसर बदली होईल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना वर्षाची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे गोंधळ उडाला. काही दिवसांत मुदतवाढ मिळालीच कशी, अशी चर्चा सुरू झाली अन्‌ त्यावरून राजकीय रंगत वाढली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गटही सक्रिय आहे. कोणीही स्पष्ट बोलत नसले तरी श्री. डांगेंच्या बदलीच्या चर्चेने राजकीय पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. कही खुशी, कही गम वातावरण आहे. "जनशक्ती'कडून ताकद लावून वरिष्ठ पातळीवरून डांगेंच्या मुदवाढीला कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे. "लोकशाही'ची भूमिका स्पष्ट नसली तरी तेही मुदतवाढीच्या बाजूनेच आहेत. तर भाजप नगरसेवकांच्या गोटात आनंदी आनंद आहे. भाजपचे नगरसेवक व डांगे यांच्यात पालिकेच्या प्रत्येक मासिक बैठकीत वाद ठरलेलाच असायचा. तर "जनशक्ती'शी मुख्याधिकाऱ्यांचे चांगलेच सूत जुळले होते. "जनशक्ती'चे नाराज नेते व त्यांचे पाच समर्थक नगरसवेकही भाजपच्या हातात हात घालून तर कधी मौन धारण करून प्रत्येक कृतीला साथ देत होते. त्यामुळे "जनशक्ती'चे नेते राजेंद्र यादव यांचे समर्थक फक्त डांगे यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुदतवाढ रद्द होणार असल्याच्या चर्चेने कही खुशी, कही गम सारखी स्थिती झाली आहे.

Video : सातारा सांगलीच्या हद्दीवरील चेकपोस्टची 'या' मंत्र्यांकडून अचानक पाहणी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सातारा पालिकेने उचलले 'हे' महत्वाचे पाऊल 

केवळ एका प्रश्नामुळे... 

कार्यकाल संपल्यानंतरही एक वर्षाची मुदतवाढ पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना मिळाली. कार्यकाळ संपल्यानंतर बदली होईल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला होती. मात्र, त्याउलट मुदतवाढ मिळाल्याने चव्हाण गटात खळबळ उडाली. त्यावेळी प्रशासकीय पातळीवर चव्हाण गटातर्फे मुदतवाढ देताना कोणत्या मुद्यावर देण्यात आली आणि ती देताना स्थानिक आमदारांना विचारले होते काय, असा एकच प्रश्न विचारण्यात आला अन्‌ तेथून बदली रद्दच्या चर्चेचा एकच गोंधळ सुरू झाला. 

माण, खटावातील लोकांना दळणवळणाची सोय चांगली झाली पण घाटात... 

तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा

""कोरोनाच्या काळात मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या प्रशासकीय बदलीचा घाट घातला जात असून, अशा महामारीच्या काळात बदली होणे योग्य नाही. कोरोनाचा सेटअपही चांगला बसला आहे. अशा काळात डांगेंची बदली होणे व त्यामागे राजकीय दबाव असणे ही गोष्ट कऱ्हाड शहरासाठी अत्यंत वाईट आहे. त्यामुळे ती मुदतवाढ रद्द होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'' 

राजेंद्र यादव, गटनेते जनशक्ती आघाडी 



यशवंत डांगे यांनी नगरसेवकांमध्ये वाद लावून राजकारण करून स्वार्थ साधला आहे. नगरसेवकांना किंमत द्यायची नाही. कोणती माहिती द्यायची नाही. सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना हाताशी धरून कारभार करण्याचा पायंडा पाडत नगरसेवकांचा त्यांनी अपमान केला. सत्ताधारी वगळता अन्य नगरसेवकांना  ते अरे तुरेची भाषा वापरतात. अशा बेशिस्त मुख्याधिकाऱ्यांनी कार्यकाल संपल्यानंतर बदली होईल, तेथे जाणेच योग्य आहे.'' 

विनायक पावसकर, गटनेते, भाजप, कऱ्हाड पालिका

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT