Karad Municipality esakal
सातारा

कऱ्हाड पालिकेत राजकारण तापलं

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या (Karad Municipal Garbage Project) ‘डीपीआर’च्या चौकशीसहित अन्य तक्रारींच्या नेहमीच भीमगर्जना होतात. मात्र, त्या तक्रारींचा पाठपुरावा होण्याऐवजी राजकीय तडजोडी होत आहेत. अनेक तक्रारी थेट मांडून त्यांच्या चौकशीचे ठराव झाले. मात्र, एकाही तक्रारीचा शेवट कोणीच गाठला नाही. ठराव किंवा तक्रार झाली की, त्यात होणारी राजकीय तडजोड आता चर्चेत येऊ लागली आहे. सोयीस्कर तो विषय बाजूला सारला जातो. (Politics Started In Karad Municipality Over Garbage Project bam92)

स्वच्छ सर्वेक्षणाचा मुलामा लावण्यात आला खरा. त्यानंतर आताही त्या तक्रारींचे काय झाले, याचा कोणीच पाठपुरावा करत नाही.

सहा महिन्यांपासून भ्रष्टाचाराचे केवळ आरोप व तक्रारी होत आहेत. त्याचा शेवट कोणीच लावताना दिसत नाही. कचरा डेपोत तर साऱ्यांनीच तक्रारी केल्या. राजकीय तडजोडी झाल्या की, माघार घेतली गेली आहे. ‘बायोमायनिंग’च्या जादा बिलाबाबत जनशक्ती (Janshakti Aghadi), लोकशाहीने Lokshahi Aghadi, तर भाजपने (BJP) कचरा डेपोच्या ‘डीपीआर’च्या चौकशीची तक्रार केली होती. त्यात तेरी भी चूप अन् मेरी भी चूप... सारखाच प्रकार झाला अन् तो विषय बाजूला पडला.

त्याला स्वच्छ सर्वेक्षणाचा (swachh survekshan 2021) मुलामा लावण्यात आला खरा. त्यानंतर आताही त्या तक्रारींचे काय झाले, याचा कोणीच पाठपुरावा करत नाही. आरोप, तक्रारीनंतर हवी ती राजकीय तडजोड सहज होते. कोणत्याही नगरसेवकाने तक्रार अखेरपर्यंत किंवा तडीस नेलेली नाही. आघाड्यांकडून केवळ भीती दाखविण्यासाठी तक्रारी होतात. आम्ही हे बाहेर काढू, ते बाहेर काढू, अशा वल्गना होतात. मात्र, प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्या धमक्यांच्या आधार घेऊन सोयीस्कर राजकीय तडजोडी मात्र निश्चीतपणे होतात, अशा तथ्यहीन आरोपांमुळे नगरसेवकांबद्दल शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

...अशा आहेत केवळ तक्रारी

  • बायोमायनिंगच्या दहा लाखांचे जादा बिल अदा केल्याच्या चौकशीची ठराव होऊनही प्रत्यक्षात हालचाल नाही

  • कचरा डेपोच्या ‘डीपीआर’च्या चौकशीची मागणी भाजपसहित उपाध्यक्षांकडून तडीस नाही

  • निधी बदलून दुसरीकडे वापरल्याची तक्रारही झाली, प्रत्यक्षात पाठपुरावा नाही

  • स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामांची चौकशीचीही मागणी झाली, पाठपुरावा नाही

  • स्वच्छ सर्वेक्षणात ८० लाखांच्या कामाची बिले केल्याची सभेत तक्रार झाली, पाठपुरावा नाही

  • पालिकेतील टक्केवारी घेणाऱ्यांची चौकशीची सभेत मागणी केली, प्रत्यक्षात कारवाई काही नाही

  • पालिकेतील सीसीटीव्ही फुटेज गायब होते, त्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या तरीही कारवाई शून्य

  • इतिवृत्तातील खाडाखोड प्रकरणी कारवाईही नाही, तक्रार झाली, पाठपुरावा नाही

  • स्वाक्षऱ्यांच्या प्रकरणात केवळ तक्रारी झाल्या, कारवाई काहीच नाही

  • खराब रस्त्यांच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, कारवाई शून्यच

Politics Started In Karad Municipality Over Garbage Project bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: पडिक्कलने कोणालाच न जमलेला विक्रम केला, निवड समितीच्या नाकावर टिच्चून केली दमदार खेळी; मुंबईला फेकले स्पर्धेबाहेर

BJP Mumbai : मुंबईचा भूमीपुत्र, ‘मराठी माणूस’ मुंबईतच राहणार!',भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'

Crime News : मुलाच्या निधनानंतर पैशाची हाव; सासऱ्याचं सुनेसोबत भलतंच कृत्य, महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

Pune Crime : "पोलिसांत गेला तर जीपला बांधून वरात काढीन"; सावकाराची धमकी, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT