सातारा

माण तालुक्‍यातील डाळिंबाची पुण्यात सरशी, उच्चांकी दराने शेतकऱ्यांना दिलासा

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील डाळिंबाला पुण्याच्या फ्रूट मार्केटमध्ये सलग तीन दिवस उच्चांकी दर मिळतो आहे. त्यात मोहीच्या सचिन देवकर या शेतकऱ्याच्या मालाला 250 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. 

कोरड्या दुष्काळाची सवय झालेल्या या भागाला दोन वर्षांपासून पडत असलेल्या पावसामुळे पहिल्यांदा ओला दुष्काळ काय असतो ते पाहायला मिळाले. सततचा पाऊस, विविध रोगांचा सामना करत माणमधील मोहीच्या सचिन देवकर या शेतकऱ्याने डाळिंबाची चांगली जोपासना केली. या बागेचा तोडा सुरू झाला असून, जागेवर माल देण्यापेक्षा ते पुणे येथील के. डी. चौधरी फ्रूट कंपनीत माल नेत आहेत. उच्च प्रतीचा व दर्जेदार माल असल्यामुळे त्यांच्या मालाला सलग तीन दिवस उच्चांकी दर मिळाला आहे. 250 रुपये प्रतिकिलो हा त्यांना उच्चांकी दर मिळाला. यामुळे त्यांचा कंपनीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

डाळिंब तोडण्यास आली असताना काही व्यापारी बागेतून फिरून गेले. चांगले दर असतानाही व्यापारीवर्ग चांगल्या मालाचेही दर पाडून मागू लागले. त्यामुळे माल जागेवर न देता पुण्याच्या मार्केटमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. चांगल्या मालाला मार्केटमध्ये एक्‍स्पोर्ट दरापेक्षाही चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल मार्केटलाच नेणे योग्य आहे, असे मोहीतील शेतकरी श्री. देवकर यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT