Sharad Pawar esakal
सातारा

'तुम्ही शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात अन् विरोधात काम केलं'

महेश बारटक्के

'पवार ज्या पक्षात होते, त्या पक्षात प्रामाणिकच राहिले.'

कुडाळ (सातारा) ः माझ्यावर टीका करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी कारखान्यासंदर्भात बोलावे, कारखाना स्थापनेपासून काही हंगाम वगळता कारखाना भाडेतत्त्वावर चालू आहे. कारखाना भाड्याने देताना सभासदांना विचारले नाही. सहकारात परिवर्तन झाले तरच संस्थेची प्रगती होईल. जावळीचे आमदार म्हणतात मी सभासद नाही हे मान्य; पण तुम्ही तरी कुठे सभासद आहात. तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी थांबवण्यासाठी परिवर्तन घडवा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार (Deepak Pawar) यांनी प्रचारसभेच्या सांगता सभेवेळी केले.

येथे कारखाना बचाव पॅनेलच्या वतीने सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘जावळीच्या विद्यमान आमदारांना जर खरच सौरभ शिंदे (Saurabh Shinde) आणि प्रतापगड कारखान्याचा (Pratapgad Factory Election) कळवळा असता तर बॅंकेचे अध्यक्ष असताना कारखान्याला मदत केली असती. निवडणूक म्हटले की आरोप- प्रत्यारोप केले; पण एवढ्या खालच्या पातळीची टीका आम्ही केली नाही. कुडाळ जिल्हा परिषद (Kudal Zilla Parishad) गटातून तीन वेळा निवडून येत असल्याने येथील जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळेच ही निवडणूक त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे.’’

सुधीर पवार म्हणाले, ‘‘गेली २५ वर्षे जे सभासदांच्या दारात गेले नाहीत. ते या निवडणुकीच्या माध्यमातून जाऊ लागले आहेत. दीपक पवार ज्या पक्षात होते. त्या पक्षात प्रामाणिकच राहिले. तुम्ही मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षातून निवडून आलात तरी आज त्यांच्या पक्षाच्या विरोधात काम करत आहात. ज्यांनी कारखाना उभारणीसाठी प्रामाणिकपणे मदत केली ते सभासद आज तुमच्याबरोबर आहेत का? आम्ही संस्था काढल्या. त्या आजही अस्तित्वात आहेत. आमच्या शिक्षण संस्था आजही दिमाखात सुरू आहेत. तुम्ही साधी बालवाडी सुद्धा काढली नाही.’’ या वेळी बचाव पॅनेलचे उमेदवार भानुदास भोसले, शिवाजीराव गायकवाड, संजय शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रकाश रासकर यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT