सातारा

साताऱ्यातील प्रतापसिंह उद्यान बालचमूंनी गजबजणार; दुरुस्तीच्या कामाला प्रचंड वेग

गिरीश चव्हाण

सातारा : शहराच्या मध्यवर्ती भागातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यानाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने सुरू केले आहे. हे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानंतर उद्यान नागरिकांसाठी खुले होणार आहे. दुरुस्ती व इतर तांत्रिक बाबींमुळे हे उद्यान गेले दोन वर्षे बंद होते. 

शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या मालकीचे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान आहे. मध्यवर्ती भागातील या उद्यानात शहरातील नागरिकांची तसेच बालचमूंची दररोज मोठी गर्दी व्हायची. रेल्वे व इतर अद्ययावत खेळणी तसेच समोरील मैदानात चौपाटी असल्याने हा भाग नेहमीच गर्दीने फुललेला असायचा. उद्यानाचे व्यवस्थापन पालिकेने एका विश्‍वस्त संस्थेला दिले होते. मध्यंतरीच्या काळात हे उद्यान विश्‍वस्त संस्थेने पुन्हा पालिकेकडे सुपूर्द केले. संचलन आणि नियमन करणे शक्‍य न झाल्याने तसेच पालिकेच्या दुर्लक्षामुळे सदर उद्यान बंद झाले. हे उद्यान सुरू करावे, यासाठीचा पाठपुरावा अनेक नगरसेवकांनी पालिकेकडे केला. मात्र, त्यात यश आले नाही. देखभाल आणि दुरुस्तीअभावी उद्यानातील खेळण्यांची पुरती दुरवस्था झाली. उद्यान बंद असल्याने नागरिक तसेच बालचमूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. 

दरम्यान, उद्यानाच्या दुरुस्तीचा विषय पालिकेच्या अजेंड्यावर आला. खेळण्यांची दुरुस्ती, नवीन खेळणी बसवणे तसेच इतर कामांसाठी पालिकेने विविध योजनांतून यासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. यानुसार येथील काम सुरू करण्यात आले आहे. गंजलेली, तुटलेली खेळणी बाजूला हटवत या ठिकाणची दुरुस्ती अत्यंत संथ गतीने सुरू झाली होती. कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे सदर काम पूर्णपणे ठप्प झाले होते. मात्र, ठप्प झालेले हे काम माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे यांच्या प्रयत्नांतून पुन्हा एकदा सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात येथील तुटलेले कठडे नव्याने बांधण्याचे तसेच वाढलेली झाडेझुडुपे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्य:स्थितीत येथे नव्याने झाडे लावण्याचे आणि लॉनचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, पाण्याची टाकी, अंतर्गत पाइपलाइन, ज्येष्ठ नागरिक भवनाच्या छताची दुरुस्ती, पेव्हर दुरुस्ती, रेलिंग व खेळणी दुरुस्तीचे काम टप्प्याटप्याने सुरू आहे. 

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान दुरुस्ती, नूतनीकरणाचे काम दोन महिन्यांत पूर्ण होऊन हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे. 
-किशोर शिंदे, नगरसेवक 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT