Mayor Dr. Pratibha Shinde esakal
सातारा

लाच प्रकरणी मंत्री तनपुरेंचा अ‍ॅक्शन मोड

डॉ. प्रतिभा शिंदे सहा वर्षांसाठी निलंबित

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर वाईच्या थेट नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे (Mayor Dr. Pratibha Shinde) यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा महत्त्‍वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या (Urban Development Department) राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. यापुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्रधिकरणाच्या सदस्य होण्यास त्‍यांना अपात्र ठरविण्यात आले असल्याचे यासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

डॉ. प्रतिभा शिंदे या सन २०१६ पासून नगराध्यक्षपदावर कार्यरत आहेत.

डॉ. प्रतिभा शिंदे या सन २०१६ पासून नगराध्यक्षपदावर कार्यरत आहेत. शहरातील शौचालयाच्या बांधकामांचे देयक काढण्याच्या मोबदल्यात १४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती त्यांचे पतीमार्फत स्वीकारल्यामुळे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती यांच्याविरुद्ध १ जून २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावर पालिकेतील १६ नगरसेवकांनी त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती. त्याची सुनावणी २० ऑगस्ट २०२० आणि ३० सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १६६५ चे कलम ५३ (अ) आणि ५५(ब) नुसार वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आल्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister Prajakt Tanpure) यांनी काढला आहे. त्याची प्रत नगराध्यक्षा डॉ. शिंदे व जिल्हाधिकारी सातारा यांना पाठविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT