prithviraj chavan and mp udayanraje bhosale sakal
सातारा

Karad News : पृथ्वीराज चव्हाणांचा खासदार उदयनराजेंवर पलटवार; म्हणाले, त्यांना सही करता येते की नाही हे..

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कित्येक वेळा मी त्या फाईलवर सही करा म्हंटले. मात्र त्यांना सही करता येत नाही की काय? मात्र त्यांनी सहीच केली नाही.

हेमंत पवार

कऱ्हाड - पाच जिल्ह्यासाठी एक कृषी विद्यापीठ मंजुर करावे अशी माझी मागणी होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कित्येक वेळा मी त्या फाईलवर सही करा म्हंटले. मात्र त्यांना सही करता येत नाही की काय? मात्र त्यांनी सहीच केली नाही अशी टिका खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. त्यावर आमदार चव्हाण यांनी सही करता येत नाही हे कारण असू शकते का? सही करता येत की नाही ते महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे असा पलटवार केला.

सातारा येथे खासदार भोसले यांनी पाच जिल्ह्यासाठी एक कृषी विद्यापीठ मंजुर करावे अशी माझी मागणी होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कित्येक वेळा मी त्या फाईलवर सही करा म्हंटले. त्यांनी जागा कुठे आहे असे विचारले. जिल्ह्यात शासकीय जागा असताना रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र त्यांनी फाईलवर सही केली नाही.

मात्र त्यांनी का सही केली नाही हे मला कळत नाही कि त्यांना सही करता येत नाही? हे काय कळत नाही. सही केली असती तर साताऱ्याच्या मुलांना पुण्याला व इतर ठिकाणी जावे लागले नसते. ते पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. त्यांनी आयआयटी, आयआयएमचा प्रोजेक्ट आणला असता. मात्र त्यांनी तसे केले नाही अशी टिका आमदार चव्हाण यांच्यावर केली होती. त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, सही येत नाही हे कारण असु शकेल का? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.

सातारा जिल्ह्यात सरकारी कृषी कॉलेज व्हावे अशी माझी इच्छा होती. त्यानुसार जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात आम्ही शासकीय कृषी माहविद्यालय कऱ्हाडला सुरु केले. खासदार भोसले यांचे कॉलेज खासगी होते की सरकारी होते, जागा उपलब्ध होती का? हा काय विषय ते मला आत्ता आठवत नाही. सरकारी जागा पण द्या आणि मला खासगी कॉलेज द्या अशी मागणी असेल तर वेगळ्या पध्दतीने त्याचा विचार केला गेला असेल असेही त्यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada: सहकार क्षेत्रात मोठा चमत्कार! ९८ पैकी ९८ मतं एकाच उमेदवाराला! विरोधकांचा पूर्ण सुफळा साफ; संजना जाधव यांचा ऐतिहासिक विजय

Mumbai Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा रेड अलर्ट

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

SCROLL FOR NEXT