Congress Committee esakal
सातारा

कॉंग्रेस समितीत पृथ्वीराज चव्हाणांसह उदयसिंहांवर मोठी जबाबदारी

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या (Maharashtra state Congress Committee) शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan), सरचिटणीसपदी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar), तर कार्यकारी समितीवर अजितराव पाटील-चिखलीकर (Ajitrao Patil-Chikhalikar) यांची वर्णी लागलीय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (All India Congress Committee) सचिव के. सी. वेणुगोपाल (Secretary K. C. Venugopal) यांनी काल रात्री या निवडी जाहीर केल्या.  

काँग्रेस समितीच्या मोठ्या कालवधीनंतर निवडी जाहीर झाल्या आहेत.

काँग्रेस समितीच्या मोठ्या कालवधीनंतर निवडी जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांचे पक्षासाठीचे योगदान आणि त्यांनी केलेल्या कामाचा विचार करुन त्यांच्यावर शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. त्याचबरोबर माजी मंत्री उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील यांच्यावर राज्यपातळीवर सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलीय. त्यांनी मागील वर्षी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या गटाशी जुळवून घेवून कॉंग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

त्यांना त्यासाठी आणखी बळ मिळावे, या हेतूने कॉंग्रेसने त्यांच्यावर राज्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे उंडाळकरांच्या रयत संघटनेत आनंदाचे वातावरण आहे. कॉंग्रेस पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून परिचित असणारे अजितराव पाटील-चिखलीकर यांची कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांनी पक्षाच्या अनेक सभा गाजवल्या आहेत. त्यांनी यापूर्वीही पक्षाच्या अनेक समित्यावंर काम केली आहे. तिघांच्या निवडीमुळे कऱ्हाड तालुक्यातील काँग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT