मल्हारपेठ (जि. सातारा) : पाटण तालुक्यात बीएसएनएल सेवेचा पुरता बोऱ्या उडाला असून, खंडित सेवेमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोबाईल रेंज आणि इंटरनेट सेवा विस्कळित झाल्याने पोस्ट, बॅंकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे.
डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील कानाकोपऱ्यात नागरिकांच्या हातात मोबाईल पोचले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बीएसएनएलची रेंज नसल्याने ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. मारूल हवेली, मल्हारपेठ, नवारस्ता विभागातील बीएसएनएल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेली सेवा खंडित झाली आहे. काही दिवसांपासून ही सेवा ठप्प असूनदेखीलही या विस्कळित कारभाराकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
शेतकरी, विद्यार्थी, शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी पुरते वैतागले आहेत. इंटरनेट बंद झाल्याने पोस्ट आणि बॅंकांतील व्यवहार बंद आहेत. त्या ठिकाणचे कर्मचारी निव्वळ बसून असून, कामे होत नसल्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. त्यासंदर्भात "बीएसएनएल'च्या कार्यालयात अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उर्मट व उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. "बीएसएनएल'च्या या अनागोंदी कारभारामुळे नाईलाजास्तव ग्राहक इतर टेलिकॉम कंपनीकडे वळत आहेत. "बीएसएनएल'चे ग्राहक कंपनीच्या विस्कळित कारभारावर पुरते वैतागले आहेत. मोबाईल व इंटरनेटची सेवा पुरविण्याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांच्यातून होत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.