सातारा

किवळची रथ मिरवणूक रद्द; नावजीनाथाचे दर्शन लाभणार

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किवळ (ता. कऱ्हाड) येथील त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने रविवारी (ता. 29) भरणारी संत नावजीनाथ देवाची यात्रा व रथाची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. संत नावजीनाथ देवस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. 

उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, देवस्थान समितीचे अध्यक्ष भानुदास साळुंखे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. विजय साळुंखे, देवस्थान समितीचे सचिव रामराव साळुंखे, माणिकराव साळुंखे, शंकर साळुंखे, पोपटराव साळुंखे, मनोज फल्ले, मनोज नलवडे उपस्थित होते. तमाशा कार्यक्रम, कुस्ती मैदान, सांस्कृतिक कार्यक्रम, रथाची मिरवणूक रद्द करण्यात आली.

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली 

नावजीनाथ मंदिराशेजारील मैदानात रथ उभा करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व मास्कचा वापर करूनच रथाचे दर्शन घेता येईल. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत रथपूजन होईल. संत नावजीनाथ व श्री ज्योतिर्लिंग मंदिरात नागरिकांनी सकाळपासून ते संध्याकाळ नऊपर्यंत सोशल डिस्टन्स ठेऊन दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

SCROLL FOR NEXT