Karad Municipality esakal
सातारा

ठाण्याच्या सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा कऱ्हाडात निषेध

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Assistant Commissioner Kalpita Pimple) यांच्यावरील हल्ल्याचा येथील पालिकेत आज निषेध झाला. यावेळी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी घोषणा बाजी करत निषेध नोंदवला. दरम्यान, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निषेध करणारी मनोगतेही व्यक्त केली.

ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा कऱ्हाड पालिकेत आज निषेध झाला.

या हल्ल्याच्या निषेधार्थ वेळ पडली, तर काम बंद आंदोलन करणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके (Ramakant Dake) यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात कल्पिता यांची दोन बोटे कापली गेली आहेत. हातासह डोक्यावरही जखम झाली आहे. पिंगळे यांच्या अंगरक्षकही जखमी आहेत. या भ्याड हल्ल्याचा आज येथे निषेध करण्यात आला. आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, एन. एस. पवार, एम. एच. पाटील, कामगार संघटनेचे आनंदा खवळे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, सुनिता आठवले यांच्यासह उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

Government Subsidy Disabled: आनंदाची बातमी! दिव्यांगाच्या टुलकिटसाठी १५ हजारांचे अनुदान; लवकरच हाेणार अंमलबजावणी, 3९ वर्षांनंतर अनुदानात वाढ..

SCROLL FOR NEXT