शासन मदतीचा अद्यादेश फाडून निषेध; 'रयत'कडून शेतकऱ्यांना जादा भरपाईची मागणी sakal
सातारा

शासन मदतीचा अद्यादेश फाडून निषेध; 'रयत'कडून शेतकऱ्यांना जादा भरपाईची मागणी

हेमंत पवार-सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः अतिवृष्टीतील बाधीतांना देण्यात येणाऱी मदत ही अत्यंत तोकडी असुन त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी करत रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले. यावेळी शासनाने काढलेला मदतीचा आद्यादेश त्यांनी फाडुन मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिल्याची माहिती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिली.

महापुर, अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी खचला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडुन भरीव मदतीची अपेक्षा होती. मात्र शासनाने अद्यादेश काढुन केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप करुन श्री. नलवडे म्हणाले, अतिवृष्टीतील बाधीतांना देण्यात येणाऱी हेक्टरी दहा व पंधरा हजारांची मदत ही अत्यंत तोकडी आहे. त्यामध्ये वाढ करुन बागायती शेतीसाठी हेक्टरी एक लाख आणि जिरायती जमिनीसाठी हेक्टरी 60 हजार रुपये देण्याची आमची मागणी आहे.

शासनाने ती मदत तातडीने शेतकऱ्यांना द्यावी यासाठी आम्ही शासनाने काढलेल्या अद्यादेश फाडुन निषेध व्यक्त करत आहोत. वाढीव मदत मिळाली नाही तर यापुढेही तीव्र आंदोलन करु असा इशारा तहसीलदार यांना निवेदन देवुन शासनाला दिला आहे. येणाऱ्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी कष्ट करुन पिकवलेल्या ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी अशीही मागणी केल्याचे श्री. नलवडे यांनी सांगीतले. यावेळी संघटनेचे अशोक लोहार, योगेश झांबरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT