Dnyaneshwar Maharaj Palkhi esakal
सातारा

Ashadhi Wari : पालखी मार्गावरील मटण, बिअर बार, मद्य विक्री बंद करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ज्ञानेश्‍वर महाराज पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा १८ ते २३ जून या कालावधीत जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

वारी सोहळ्यामध्ये पॅकबंद पाण्याच्या बॉटल्यांची विक्री करण्यात येते. हे पाणी पिण्यायोग्य आहे का, याची खातरजमा करावी.

सातारा : श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा १८ ते २३ जून या कालावधीत जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या कालावधीत पालखी सोहळ्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सर्व निवासी डॉक्टर यांच्या चोवीस तास कालावधीसाठी नेमणुका कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, ‘‘मॉन्सूनला अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व त्या स्त्रोतातून दिवसाकाठी किती टँकर भरले जाऊ शकतात, तसेच पालखी मार्गाच्या शेजारील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत आहेत का, याची खात्री करावी. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पालखी तळ, विसावा, सुलभ शौचालय, हिरकणी कक्ष, गॅस सिलिंडर वाटप, पिण्याचे पाणी, स्नानगृह इत्यादीबाबत माहिती दर्शविणारा नकाशा ठिकठिकाणी लावावा.’

वारी सोहळ्यामध्ये पॅकबंद पाण्याच्या बॉटल्यांची विक्री करण्यात येते. हे पाणी पिण्यायोग्य आहे का, याची खातरजमा करावी. पालखी कालावधीत मार्गावर व तळावर वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी.’’ पालखी मार्गावरील मटण, मांस, बिअर बार, मद्य विक्रेते यांना बंद ठेवण्याबाबत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कार्यवाही करावी, तसेच मार्गावर दर दोन किलोमीटर अंतरावर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी, अशाही सूचना डुडी यांनी केल्या.

आषाढी वारीकरिता ॲपची निर्मिती

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना एका क्लिकवर आवश्यक ती माहिती व संपर्क उपलब्ध होण्यासाठी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी यांचे थेट दर्शनासाठी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाने ॲप तयार केले आहे. https://bit.ly/3wZUC5G हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर एक लॉगिनचे ऑप्शन येईल, तेथे Google चा सिम्बॉल येईल, त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईमध्ये जो Email ID रजिस्टर आहे. त्याचा ऑप्शन येईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपले लॉगिन ॲपमध्ये होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT