सातारा

पुसेगाव उद्यापासून बंद; पाच दिवस मेडिकल, दवाखानेच राहणार सुरू

सलीम अत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुसेगाव ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून (ता. 10) ते बुधवारपर्यंत (ता. 16) जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत औषध दुकाने व दवाखाने वगळता सर्व व्यवहार व बाजारपेठ बंद राहणार आहे. पुसेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दररोज दहापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 

उत्तरोत्तर वाढत जाणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुसेगाव ग्रामस्थ व येथील विविध व्यापाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. या वेळी पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, प्रताप जाधव, माजी अध्यक्ष शिवाजीराव जाधव, अंकुशराव पाटील, सुश्रूत जाधव, प्रा. केशव जाधव, दीपक तोडकर, विविध व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पुसेगाव व परिसरातील विसापूर, नेर, वेटणे, खातगुण, बुधमध्ये बाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवड्यात पुसेगाव व परिसरात कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांची संख्याही वाढत आहे.

सावधान! गाईवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, मग अशी घ्या काळजी
 
पुसेगाव ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्याने येथे विविध गावांतून लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करतात. शिवाय सध्या वडूज, दहिवडी व कोरेगाव येथे लॉकडाऊन असल्याने येथील सर्व बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे वडूज, दहिवडी व कोरेगाव परिसरातील लोक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे सात दिवस पुसेगाव बाजारपेठही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहणार असून, इतर सर्व व्यवहार व बाजारपेठ काटेकोरपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambaghat Tunnel Project : 2,500 कोटी रुपये खर्च अन् 7 किमी लांबी...; आंबाघाटातील प्रस्तावित सहापदरी बोगदा कसा असेल? केंद्राकडे 'त्या' तीन पर्यायी अलाइनमेंट सादर

Wedding Muhurat 2027 : तुळशी विवाहानंतर सनई-चौघडे वाजणार; नव्या वर्षात सर्वाधिक मुहूर्त, पाहा जानेवारी ते जून 2027 चे संपूर्ण वेळापत्रक

Ganpatipule Tourism : सलग सुट्ट्यांमुळे कोकण 'हाऊसफुल्ल'! गणपतीपुळ्यात अवघ्या 3 दिवसांत तब्बल 60 हजार पर्यटकांची हजेरी, वॉटर स्पोर्ट्ससह आरे-वारेतील 'या' थरारक खेळाला सर्वाधिक पसंती

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT