Pune Satara Highway Khambataki tunnel twice three days iron angle hit train police investigation traffic police Sakal
सातारा

Pune Satara Highway : खंबाटकी बोगद्यात तीनदिवसात दोनदा लोखंडी अँगल गाडीवर आदळला अन्...

यावेळी बोगद्यातील एकच लेन सुरु ठेवण्यात आली . दरम्यान हा लोखंडी अँगल काढण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( N.H.I. )कडून क्रेन उपलब्ध झाली नाही.

अशपाक पटेल

खंडाळा - सातारा - पुणे महामार्गावरील गुरुवारी रात्री दीड वाजता खंबाटकी बोगद्यात पुन्हा लोखंडी अँगल स्विफ्ट कार ( नंबर MH-01 -BG-7760 ) चे बोनेटवर आदळला. सुदैवाने जखमी कोणी नाही मात्र गाडी चे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी एकच लेनने वहातुक सुरु ठेवली होती .

ही घटना तीन दिवसात सलग दोनवेळा झाल्याने महामार्ग प्राधिकरणाला ' उघडा डोळे, बघा नीट' म्हणण्याची वेळ आली आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

यावेळी बोगद्यातील एकच लेन सुरु ठेवण्यात आली . दरम्यान हा लोखंडी अँगल काढण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( N.H.I. )कडून क्रेन उपलब्ध झाली नाही. यावेळी महामार्ग पोलीस भुईंज ,जोशी विहीर यांनी सदरचा अँगल महामार्ग पोलीस यांनी प्रवाशांच्या मदतीने हाताने उचलून बाजूला केला.

यानंतर अडीच तासाने पुण्याकडे जाणारी वाहतूक दुसरी लेन ही सुरु झाली. यावेळी महामार्ग पोलीस पथक भुईजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे,पोलीस उपनिरीक विजय जाधव, पोलीसकृष्णकांत निंबाळकर, पोलीस हवालदार संतोष लेऺभे यांनी शर्थीने खिंड लढवत हा भलामोठा अँगल प्रवाशांच्या मदतीने बाजुला केल्यानेच वहातुक सुरळीत झाली.अन्यथा आज ही खंबाटकीत पुन्हा वहातुक कोंडी झाली असती.मात्र लोखंडी अँगल तत्काळ काढणे गरजेचे आहे .

खंबाटकी बोगद्यातील लोखंडी अँगल रात्री पुन्हा कार वर आदळला

900 मीटरचा बोगदयात प्रत्येक १० फुट वर हे अँगल आहे. हे लोखंडी अँगल सन २००० ला बसवले आहे. यास २२-२३ वर्ष झाल्याने हे गंजुन खाली पडत आहे. असे जवळपास ५० असे भलेमोठे लोखंडी अँगल अद्यापही आहेत .अचानक लोखंडी भलामोठा अँगल महामार्गावरील चालु गाडीवर पडल्यास जीवघेणा ठरू शकतो. याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजचे आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT