सातारा

सातारा : साखळी तुटली रे...., आता गाव कोरोनामुक्त हाेणार रे...ग्रामस्थ आनंदले

संदीप गाडवे

केळघर (जि.सातारा) : कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या जावळी तालुक्यातील पुनवडी गावातील 162 पैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून आजअखेर 158 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे गावाला दिलासा मिळाला आहे. आता फक्त दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांना यश आले.
 
पुनवडी येथे आठ जुलै रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्ण वाढत गेली. रुग्णांची साखळी 162  पर्यंत पोचली. गावात बाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण होते. साखळी खंडित करण्यासाठी तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, आरोग्य सेविका आस्मा शेख, आरोग्य सेवक मोहन शिंदे, आशा कविता पार्टे, अंगणवाडी सेविका संजना पार्टे यांनी मोलाचे प्रयत्न केले. अवघ्या तीन आठवड्यात पुनवडी येथील बाधितांनी कोरोनावर आपल्या इच्छाशक्तीद्वारे यशस्वीपणे मात केली आहे. सध्या दोनच ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. प्रतिबंधित क्षेत्र असल्याने गाव निर्मनुष्य झाले होते. मात्र, गावाचे रुपडे लवकरच पालटणार असून, गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वस्थितीत यावे, याचा ध्यास ग्रामस्थांनी घेतला आहे.

ब्युटीपार्लर व्यावसायिकांना हवी 15 हजार भरपाई, प्रांतांकडे साकडे

लई भारी...साताऱ्यातील पठ्ठ्याने पाणीपुरी विकून मिळविले दहावीत यश
 
कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची तपासणी करण्याचे काम व संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करणे यासाठी आशा, आरोग्य सेविका, सेवक व अंगणवाडी सेविका काम करतात. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करून या घटकांनी पुनवडी येथील परिस्थिती पूर्वपदावर आणली आहे. याबाबत गटविकास अधिकारी सतीश बुद्धे म्हणाले पुनवडी येथे 162 पैकी दोन ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, येथील ग्रामस्थांनी जिद्दीने कोरोनावर मात केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT