सातारा

येरळा नदीतून हाेणारी वाळूची तस्करी तलाठ्याने राेखली

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुसेगावचे (ता. खटाव) तलाठी गणेश बोबडे यांनी शुक्रवारी (ता. पाच) रात्री दीड वाजताच्या सुमारास येरळा नदीतून वाळूची तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्‍टरला जरंबी (राजापूर) या ठिकाणी पकडले. हा ट्रॅक्‍टर पुसेगाव पोलिस ठाण्यात लावण्यात आला असून, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अजित शिवाजी घनवट (रा. राजापूर, ता. खटाव) याच्याविरुद्ध महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

खटाव तालुका उत्तर भागातील येरळा नदीपात्रातील वाळू साठ्याचा अधिकृत लिलाव झालेला नाही. असे असतानाही या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार किरण जमदाडे, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास तलाठी बोबडे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले असता त्यांनी ही कारवाई जरंबी (राजापूर) येथे केली. महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत असून, वाळू तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

दरम्यान, काटेवाडी परिसरातील येरळा नदीपात्रातून वाळूचोरीला आळा घालण्यासाठी पुसेगावचे तलाठी बोबडे यांनी शक्कल लढवली असून, नदीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जेसीबी मशिनने चर खोदली आहे. यामुळे कोणतेही वाहन नदीपात्राकडे जाऊ शकत नसल्याने सध्या या ठिकाणी वाळूचोरी थांबली आहे.

""खटाव तालुक्‍यात महसूल प्रशासन निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याचा फायदा वाळू तस्कर घेत होते. सध्या, वाळूचोरी रोखण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेल्या यंत्रसामग्रीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात येतील.'' 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT