Python Sakal
सातारा

Python : बेलावडेत पकडले अजगर; साताऱ्यातील सर्पमित्रांकडून जीवदान

बेलावडे (ता. जावळी) येथे १२ फूट लांब अजगर वन विभागाच्या मदतीने पुणे (बावधन) रेस्क्यू टीमकडे उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : बेलावडे (ता. जावळी) येथे १२ फूट लांब अजगर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

साताऱ्यातील सर्पमित्र महेश शिंदे व त्याच्या टीमने त्यास जिवंत पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. हे अजगर वन विभागाच्या मदतीने पुणे (बावधन) रेस्क्यू टीमकडे उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले.

बेलावडे येथे विश्र्वजित शिंदे यांना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतात चक्क १२ फूट लांबीचे अजगर दिसून आले. याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली. मात्र, हे अजगर न मारता ते सुखरूपपणे पकडण्यासाठी त्यांनी सर्पमित्र महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला.

महेश शिंदे हे ओंकार ढाले, मयूर अडागळे, रोहन अहिरे, महेश अडागळे, मयूर तिखे, करण भगत यांच्‍यासमवेत साताऱ्यातून बेलावडे गावात दाखल झाले. त्यांनी अजगर सुखरूप पकडले.

त्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, गणेश महांगडे, नीलेश रजपूत, स्वप्नील चौगले, नेताजी वासुदेव, विनायक लांडगे, आकाश कोळी, समाधान वाघमोडे, राहुल धुमाळ, नवनाथ महामुलकर यांच्या मदतीने पुणे रेस्‍क्‍यू टीमकडे सुपूर्द करण्यात आले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT