pruthviraj-chavan.  sakal
सातारा

Congress: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा देशात एक चळवळ उभी करेल - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ डिजिटल टीम

Congress: काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा देशात एक चळवळ उभी करेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली. त्यासंदर्भात चव्हाण यांनी मत व्यक्त केले.


आमदार चव्हाण यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या प्रचार यंत्रणेचा आज सातारा जिल्ह्यात प्रारंभ केला. यावेळी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर आपल्या वाहनाला लावून यात्रेमधील सहभाग नोंदविला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांची न्याय यात्रा देशात अन्यायाविरोधात लोकचळवळ उभी करेल. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे. ती यात्रा १५ राज्यातून १९९ जिल्ह्यांतून जवळपास सहा हजार ५०० किलोमीटरची आहे.

भारत जोडो यात्रेच्या यशस्वितेनंतर राहुल गांधी अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभे करत आहेत. त्यासाठीच त्यांची ही न्याय यात्रा असेल. यावेळी राहुल गांधींच्या सोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे वर्किंग कमिटी सदस्य, काँग्रेसचे खासदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

तुमच्या मुलांनासुद्धा जेवताना मोबाईल लागतो का? या सवयीमुळे थांबू शकते त्यांची वाढ; संशोधनातून मोठा दावा!

ST Bus Fire: क्षणात आगीचा भडका! निरा–बारामती एसटी पूर्ण जळाली, चालकाने स्वत:चा जीव धाेक्यात घालून प्रवाशांचे वाचवले प्राण..

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

SCROLL FOR NEXT