सातारा

पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम, सातारा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 50 टक्य्यांनी वाढला

उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील पाणीसाठा 50 टक्‍क्‍यांवर गेला आहे. हा पाऊस फुलोऱ्यात आलेल्या खरीप पिकांना फायदेशीर ठरला असून, जावळी, पाटण व महाबळेश्‍वर तालुक्‍यांत भात लागणीस सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 37.70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

जून, जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दमदार सुरुवात केली. हवामान खात्याने आगामी दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाचा जोर कायम आहे. माण, खटाव व फलटण तालुक्‍यांत तुरळक पाऊस असून, उर्वरित तालुक्‍यांत संततधार पाऊस सुरू आहे. सातारा शहरासह तालुक्‍यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आजपर्यंत 6912.26 मिलिमीटर, तर सरासरी 628.39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जावळीतील भावांचे अनोखे रक्षाबंधन... बहिणीच्या आठवणीसाठी लावली 100 रोपे 

जिल्ह्यात गुरुवार (ता.सहा) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 32.62 (441.71) मिली मीटर, जावळी 52.77 (795.84), पाटण 65.09 (742.36), कराड 29. 92 (360.07), कोरेगाव 24.11 (318.72), खटाव 11.69 (282.04), माण 9.57 (264.14), फलटण 8.33 (257.40), खंडाळा 17.50 (287.20), वाई 30.71 (448.67), महाबळेश्वर 217.13 (2714.11) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 6912.26 मि.मी. तर सरासरी. 628.39 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

कोयना धरणात 60.53 उपयुक्त पाणीसाठा

कोयना धरणात आज (गुरुवार) 60.53 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 60.45 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 202 नवजा येथे 245 व महाबळेश्वर येथे 183 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम- 6.07 (51.91), धोम-बलकवडी- 2.77 (69.92), कण्हेर- 5.70 (59.44), उरमोडी 7.13 (73.87), तारळी- 3.34 (57.17), निरा-देवघर 4.21 (35.93), भाटघर- 11.45(48.72), वीर 4.35 (46.26).

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 220 बाधितांची वाढ; सर्वाधिक रुग्ण कऱ्हाड तालुक्‍यात
 

  •  वांग नदीवरील पूल पाण्याखाली; 25 वाड्यावस्तांतील दळणवळण ठप्प 
  •  पावसाने साडेतीन लाख हेक्‍टरवरील पिकांना जीवदान 
  •  पाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावर पाणी 
  •  कोयना, कृष्णा, मोरणा, केरा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ


Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT