सातारा

विंग परिसरात अवकाळीचा तडाखा; गहू, ज्वारीचे ठिकठिकाणी नुकसान

विलास खबाले

विंग (ता. सातारा) : वादळी वाऱ्यासह पावसाने विंगसह परिसरात नुकसान झाले. जोराच्या वाऱ्याने येथील प्राथमिक केंद्र शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड मोडून स्ट्रीट लाइटच्या वाहन्यावर पडले. दरम्यान वीजपुरवठा तत्पूर्वीच खंडित झाला होता. त्यामुळे धोका टळला. झाडाच्या फांद्या घरावर पडल्याने कोणतीही हानी झाली नाही. 

दरम्यान संतोष नलवडे यांच्या राहत्या घरावरील छप्पर उडून नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी रब्बीतील पिकाची काढणी सुरू आहे. त्यात व्यत्यय आला. गव्हाचे काढ भिजून नुकसान झाले आहे. संकरित ज्वारीचे ठिकठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. 

सध्या हवामानात सातत्याने बदल हाेत आहेत. कडाक्याचा उन्हाळा कुठे जाणवायला लागला असताना आता पावसाने पुन्हा एकदा दार ठोठावलं आहे. बुधवारी काही काळापूरती रत्नागिरी, सातारा व सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली हाेती. त्यामुळे शेतकरी धास्तावले हाेते. गुरुवारी विंग परिसरात पावसाने हजेरी लावली आणि काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले. 

मराठवाड्यात चार दिवस राहणार वादळी वारे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिककरांना सतर्कतेचा इशारा

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT