Heavy Rain In Satara
Heavy Rain In Satara esakal
सातारा

'वीज वितरण'ची 13 कोटींची हानी; अतिवृष्टीत 11 हजार पडले खांब!

उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत (Heavy Rain In Satara) सर्वाधिक नुकसान वीज वितरण कंपनीचे (Power Distribution Company) झाले आहे. पाटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यांत खांब पडणे, लाइन तुटणे, ट्रान्स्‍फॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार १३ कोटींचे नुकसान झाले आहे. सध्या ११ हजार वीज ग्राहक अद्याप अंधारात असून, या नुकसानीची युध्दपातळीवर दुरुस्ती सुरू आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी (Power distribution company employees) भरपावसात खांब उभे करून लाइन जोडण्याचे काम करत आहेत. (Rain News Update 11 Thousand Power Poles Fell Due To Rain In Satara District bam92)

जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान वीज वितरण कंपनीचे झाले आहे.

मागील आठवड्यात जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये वीज वितरण कंपनीला मोठा फटका बसला. वीज वितरण कंपनीचे तब्बल १३ कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये पाटण, वाई, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतील नुकसानीचा समावेश आहे. या तालुक्यांत भूस्खलनाचे मोठे नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीत वीज वितरणची सात उपकेंद्रे बंद पडली. तसेच ६५ उच्च दाब वाहिन्या पडल्या होत्या. त्यामुळे ४२३ गावे अंधारात गेली होती. दोन हजार ५० रोहित्रांचे नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिन्यांचे ४६२, तर लघुदाब वाहिन्यांचे एक हजार १२५ खांब पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ८४ हजार १९० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसाने उघडीप दिलेली नसली तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस राबून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दुर्गम भागात खांद्यावरून खांब घेऊन कर्मचारी जात आहेत. तर ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती आहे, तेथे रोपच्या मदतीने विजेच्या लाइनची दुरुस्ती केली जात आहे.

वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भरपावसात मदतकार्य सुरू केले असून, आतापर्यंत त्यांनी पाच उपकेंद्रे सुरू केली आहेत. तसेच ६५ उच्चदाब वाहिन्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. वीज पुरवठा खंडित झालेल्या ४०९ गावांचा पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. एक हजार ५६४ वितरण रोहित्रे दुरुस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे ७३ हजार ०८९ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. सध्या पाऊस सुरू असूनही चिखल तुडवत वीज वितरणचे कर्मचारी पडलेले खांब उभे करणे, वीज वाहिन्या पूर्ववत जोडण्याचे काम युध्दपातळीवर करत आहेत.

Power Pole

अतिवृष्टीत वीज ग्राहकांचे नुकसान

  • खांब पडल्याने ४२३ गावे अंधारात

  • ८४ हजार १९० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

  • ४०९ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

  • ७३ हजार ८९ ग्राहकांची वीज पूर्ववत

Rain News Update 11 Thousand Power Poles Fell Due To Rain In Satara District bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT