कोयनानगर (सातारा) : कोयना धरणांतर्गत (Koyna Dam) विभागात वाढलेला पाऊस व प्रतिसेकंद येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटावरून आठ फूटवर उचलण्यात आले आहेत. या सहा वक्री दरवाजातून विनावापर ३३,०७१ क्युसेस व कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेस असे प्रतिसेकंद ३५,१७१ क्युसेस पाणी सध्या पूर्वेकडे कोयना नदीपात्रात (Koyna and Krishna River) सोडण्यात आले आहे. (Rain Update Today 6 Door Of The Koyna Dam Were Lifted Eight Feet bam92)
धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ८४,८७८ क्युसेस इतक्या पाण्याची आवक होत आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.
धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ८४,८७८ क्युसेस इतक्या पाण्याची आवक होत आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. सरासरी प्रतिसेकंद ५० हजार क्युसेस पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याच्या शक्यता कोयना धरण व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आल्या आहेत. धरणात सध्या ८३.४३ टीएमसी पाणीसाठा व २१४५ फूट पाणी उंची झाली आहे.
रात्री काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी पुन्हा दमदार बरसायला सुरुवात केली आहे. कोयनानगरसह मिरगाव, ढोकावळे, कामरगाव, हुंबरणी घरांवर दरड कोसळली असून गावांना जाण्याच्या मार्गवरच दरड कोसळल्याने गावे संपर्कहीन झाली आहेत. तब्बल 15 लोक बेपत्ता झाल्याची माहितीही शासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात पाच लोकांना वाचविण्यात यश आले असून त्यांना शासकीय हेळवाक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Rain Update Today 6 Door Of The Koyna Dam Were Lifted Eight Feet bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.