Heavy Rain in Satara esakal
सातारा

साताऱ्यात दरड कोसळून 8 जणांचा बळी

बाळकृष्ण मधाळे

सातारा : सध्या जिल्ह्यात पश्चिम भागात जोरदार (Heavy Rain in Satara District) अतिवृष्टी होत असून जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार, सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी आज दिल्या. (Rain Update Today 8 Civilians Died Due To Heavy Rain In Satara District bam92)

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले असून यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले असून यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झालेली आहे. सध्यस्थितीत मौजे मिरगावातील 1 मयत व्यक्ती आढळून आली आहे, तर सदर भूस्खलनाखाली व्यक्ती गाडल्या गेल्या असल्यामुळे निश्चित संख्या सांगता येत नाही. सदर ठिकाणी NDRF चे 1 पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांमार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे. जावली तालुक्यातील रेंगडी गावामध्ये 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता झाल्या आहेत, तर 2 व्यक्ती मयत झाल्या आहेत.

NDRF Team

तसेच वाई तालुक्यातील कोंढावळे येथे 5 घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेली असून त्यात 2 व्यक्ती मयत आढळून आल्या आहेत. सदर ढिगाऱ्यात अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आली असून मौजे जोर या ठिकाणी 2 व्यक्ती मयत आहेत. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यामध्ये ५९४.०४ मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला असून मौजे धावरी या ठिकाणी 1 व्यक्ती मयत झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घर, शेतपिके आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात एक अतिरिक्त NDRF चे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार असून यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तत्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

Heavy Rain in Satara District

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

  • कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये.

  • नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.

  • मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.

  • जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नये.

  • नदी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थित पूल ओलांडू नये.

  • धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नये.

  • अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पसरवू नयेत.

Rain Update Today 8 Civilians Died Due To Heavy Rain In Satara District bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT