Heavy Rain In Mahabaleshwar esakal
सातारा

महाबळेश्वरात उच्चांकी पाऊस; 24 तासात 594.4 मिलीमीटरची नोंद

विकास जाधव

काशीळ (सातारा) : महाबळेश्वरात (Heavy Rain In Mahabaleshwar) मागील तीन ते चार दिवसांत मुसळधार पाऊस सुरू आहे. काल (गुरुवारी) दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला आहे. आज सकाळी साडेआठच्या २४ तासांत विक्रमी ५९४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील १३ वर्षांपूर्वी जास्तचा विक्रम मोडीत निघाला आहे. या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. (Rain Update Today Mahabaleshwar Taluka Received 594.4 MM Of Rainfall bam92)

महाबळेश्वरात मागील तीन ते चार दिवसांत मुसळधार पाऊस सुरू आहे.

राज्यात महाबळेश्वर हे सर्वाधिक पाऊस होण्याचे ठिकाण आहे. या अगोदर सर्वाधिक पाऊस ११ ऑगस्ट २००८ रोजीच्या २४ तासांत ४९०.७ मिलिमीटर पडला होती. त्यानंतर काल (ता. २२) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ४८० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने तब्बल १३ वर्षांनी आज हा विक्रम मोडीत निघाला. काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ या २४ तासांत तब्बल ५९४. ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती महाबळेश्वर येथील मोसम विभागाकडून देण्यात आली. काल दिवसभरात ३५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला होता. आजही दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळित झाले आहे.

दिवसात एक हजार मिलिमीटरवर पाऊस

महाबळेश्वरच्या इतिहास सर्वाधिक पाऊस झाला आहे. आज सकाळी साडेआठपर्यंतच्या गेल्या ४८ तासांत महाबळेश्वरात १०७४.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. इतका पाऊस होण्याची पहिलीच वेळ असून या संततधार पावसामुळे महाबळेश्वर जलमय झाले आहे.

Rain Update Today Mahabaleshwar Taluka Received 594.4 MM Of Rainfall bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन तालुक्यात पाऊस

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT