सातारा

कऱ्हाडला विजांच्‍या कडकडाटासह पाऊस

उंब्रजला वीज पडून खड्डा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - परिसरात कालपासून सलग दुसऱ्या दिवशी आज दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काल उंब्रज परिसरात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. उंब्रजला रस्त्यावरच मोठा खड्डा पडला. दुपारी झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. शहरासह तालुक्याला पावसाने झोडपल्याने नागरिकांसह विक्रेत्यांची धावपळ उडाली.

शहरासह परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी आल्या. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरासह तालुक्यातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळे काही पिकांचे नुकसान झाले. दुपारी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत तारांबळ उडाली. खरेदीला आलेले नागरिक निवाऱ्यासाठी धावत होते. भाजीमंडईतील विक्रेत्यांचे पावसाने नुकसान झाले. तालुक्याच्या दक्षिण भागात जोरदार सरी झाल्या. उत्तर भागात सायंकाळी सहानंतर पावसाने हजेरी लावली होती.

उंब्रजला वीज पडून खड्डा

उंब्रज : येथे वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. या वेळी मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी वीज पडून मोठा खड्डा पडला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसात येथील शेती उत्पन्न बाजार समिती इमारतीच्या आवारात विजांचा कडकडाट होऊन वीज पडली. त्यामुळे तेथे खड्डा निर्माण झाला. खड्ड्यात अंतर्गत दोन छिद्रे पडली असून, ती किती फूट आहे ते समजू शकले नाही. वीज पडल्यानंतर घटनास्थळी धूर झाला. सुमारे दोन तासांनंतरही खड्ड्यातून धूर येत होता. खड्ड्यातील माती काळी पडली होती. तासभर पडलेल्या पावसाने झोडपून काढल्याने रस्त्यावर पाणी साचून नाले, ओढे तुडुंब भरून वाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT