Rajya Sabha MP Sudha Murthy met MP Udayanraje Bhosale esakal
सातारा

राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्तींनी घेतली उदयनराजेंची भेट; साताऱ्यात मोठा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता!

Rajya Sabha MP Sudha Murthy : छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत रयतेचे राज्य निर्माण केले.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. मूर्ती दांपत्‍याच्‍या इन्फोसिस कंपनीने देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

सातारा : इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका, राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती (Dr. Sudha Murthy) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा भेट देऊन उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले.

दरम्‍यान, इन्फोसिसच्या (Infosys) माध्यमातून साताऱ्यात आयटी कंपनी सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून आयटीशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी साताऱ्यात आयटी प्रकल्प उभारण्याबाबत डॉ. सुधा मूर्ती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

संसदेतील पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे, विशेषत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व देशांतर्गत पर्यटन या मुद्द्यांचा उल्लेख केला होता. त्याबद्दल उदयनराजे भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.

या वेळी बोलताना डॉ. मूर्ती म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत रयतेचे राज्य निर्माण केले. जगाला हेवा वाटावा, असे अनेक पराक्रम केले. लोकशाहीचा पाया रचला. त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे.’’ डॉ. मूर्ती दांपत्‍याच्‍या इन्फोसिस कंपनीने देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात आयटी पार्क उभारण्याच्या दृष्टीने राज्य शासनाबरोबर सुरू असलेल्या प्रयत्नांची कल्पना दिली.

इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आयटी कंपनी सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून इन्फोसिसने आयटी क्षेत्राशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली, तसेच साताऱ्याला भेट देण्याचे निमंत्रणही उदयनराजे यांनी दिले. प्रकल्प उभारण्यात सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. सुधा मूर्ती यांनी दिले. यावेळी प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य चंद्रकांत पाटील, सोमनाथ धुमाळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य संग्राम बर्गे, ॲड. विनीत पाटील, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT